वृक्षारोपणासाठी एकता पत्रकार संघाचे महागाव तालुक्यातील नागरिकांना आव्हान
प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील यावर्षीचे तापमानाची त्रीव्रता लक्षात घेता
२०२७ या पुढील वर्षात तापमानाचा पारा अधिक वाढू नये आणि निसर्गाचा विपरीत परिणाम आपल्यावर होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने आताच सतर्क होण्याची गरज आहे. आपल्या गावाचे, तालुक्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावण्याची अत्यंत आवश्यकता आहे,” असे जाहीर आवाहन एकता पत्रकार संघ महागांव यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
निसर्गाचा समतोल बिघडत चालल्याने दरवर्षी उन्हाळ्याची भीषणता वाढत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील वर्षांत नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. हा संभाव्य धोका ओळखून, पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. केवळ शासन किंवा प्रशासनावर अवलंबून न राहता, प्रत्येक कुटुंबाने किमान एक झाड लावून ते जगवले पाहिजे,
“झाडे लावा, जीवन वाचवा! आपल्या भविष्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील नागरिकाने एक झाड लावावे असे आव्हान एकता पत्रकार संघ महागाव यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
