*मेडशी येथे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
मेडशी ग्रामसंसद भवन कार्यालय येथे एस बी आय आर सेटी वाशिम यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील उमेद प्रभाग संघातील होतकरू महीला करीता प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.या वेळी प्रमुख मार्गदर्शक गणेश पठारे संचालक आर सेटी वाशिम हे होते.
प्रमुख उस्थिती सरपंच शेख जमीर शेख गनी हे होते. तसेच अधिव्याख्याता वनिता सुभाष साबळे ह्या होत्या.प्रिया पाठक महिला बचत गट प्रभाग संघ प्रमुख ह्या होत्या.
गणेश पठारे यांनी बचत गटातील महिलांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण जसे की महिला शिवणकाम,ब्युटी पार्लर,जूट बॅग मेकिंग,मुलांसाठी कारपेंटर,गवंडी काम,सीसीटीव्ही कॅमेरा, इलेक्ट्रिशियन,टू व्हीलर मेकॅनिकल, दुग्ध व्यवसाय,शेळीपालन, कुक्कुटपालन अशा सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाबद्दल सविस्तर माहिती दिली.तसेच महिला बचत गटांना आश्वासन दिले की प्रत्येक महिलेला व्यावसायिक कर्ज मिळेल याची शाश्वती दिलेली आहे.महिलाना प्रशिक्षणास प्रवेश केला तर त्यांना संबधीत विषयाची सखील व परिपूर्ण माहिती देण्यात येईल.तसेच उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना प्रवृत्त व सहकार्य केले जाईल.
प्रत्येक महिलेने किमान पाच तरी प्रशिक्षणा वेगवेगळ्या ट्रेड साठी द्यावेत असे मार्गदर्शन गणेश पठारे यांनी केले आहेत.वनिता साबळे यांनी प्रशिक्षण घेयास कोणते कागदपत्र लागतात.यांच्या सह भविष्यात या प्रशिक्षणाचे फायदे व प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते या विषयी सखोल माहिती दिली.मेडशी प्रभागात एकूण 800 महिला बचत गटामध्ये आहेत. तर प्रत्येक महिलेने या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्याकडे वेगवेगळे कौशल्य अवगत करून उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी गणेश पठारे सरांनी आवाहन केले आहे.या वेळी मेडशी प्रभाग संघातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाला रामदास घुगे,शेख जावेद,सचिन साठे, विट्ठल काळे, अजिंक्य मेडशीकर यांची उपस्थित होती.
