ब्राह्मणी येथील शिवशक्ती आरामशीन परिसरातील विहिरीमध्ये मृतदेह

📍 दिनांक : 20 जून 2026

 

ब्राह्मणी येथील शिवशक्ती आरामशीन परिसरातील विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच ब्राह्मणी येथील, पोलीस पाटील आशिष निंबाळकर तसेच गावकरी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

 

मृत व्यक्तीची ओळख निरंगा हरिलाल व्यायाम (वय 55 वर्षे), रा. दिलवारा, नयनपूर, जिल्हा मंडला (मध्य प्रदेश) अशी करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती शिवशक्ती आरामशीन येथे कामगार म्हणून कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीसांकडून सखोल तपास सुरू आहे.

 

प्रतिनिधी अजय हिवराळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *