तुमस पोलिसांची तत्परता: गोमांस विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई; आरोपीचा शोध सुरू

तुमस पोलिसांची तत्परता: गोमांस विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई; आरोपीचा शोध सुरू

 

तुमसर:

भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर पोलिसांनी गोवंश हत्या आणि मांस विक्री विरोधात एक मोठी कारवाई केली आहे. फरार आरोपीचा शोध घेत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी केली.

तुमसर पोलीस स्टेशनचे पथक परिसरात गस्त घालत असताना, त्यांना फरार आरोपी ईरफान हसनअली सय्यद (४५ वर्ष, रा. दत्तात्रय नगर) हा अवैधरित्या गोमांस विक्रीसाठी बाळगून असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न लावता पंचासह घटनास्थळी धाड घेतली.

 

पोलिसांची सतर्कता आणि कारवाई:

पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. जरी आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला असला, तरी पोलिसांनी घटनास्थळावरून मुद्देमाल जप्त करून त्याचा पुढील मार्ग रोखला आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून नियमानुसार मांसाचे नमुने सी.ए. परीक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत. उर्वरित मांस पंचासमक्ष विल्हेवाट लावून पोलिसांनी आरोग्याच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने चोख पाऊल उचलले.

आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक श्री. बारसे साहेब यांच्या मार्गदर्शनात सपोनी घोडेस्वार, पो.हवा. ईडपाचे व त्यांच्या पथकाने अत्यंत प्रभावीपणे पार पाडली.

 

तुमसर पोलिसांच्या या सतर्कतेमुळे परिसरात अवैध कृत्ये करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांकडून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

 

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *