वसमत* आज दिनाक रोजी येथील रहिवासी असलेला तरुण अथर्व रवींद्र काळे याची Indian Navy मध्ये

*वसमत* आज दिनाक रोजी येथील रहिवासी असलेला तरुण अथर्व रवींद्र काळे याची Indian Navy मध्ये ‘नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर’ (Naval Air Operations Officer) या पदासाठी Sub Lieutenant ( Class 1 commissioned officer) म्हणून नुकतीच निवड झाली आहे.

अथर्व हा SGGS College of Engineering Nanded येथील BTech IT चा विद्यार्थी आहे. सैनिकाच्या गणवेशात देशाची सेवा करण्याचे त्याचे नेहमीच स्वप्न होते, जे आता खऱ्या अर्थाने साकार होत आहे. जानेवारी २०२७ पासून तो INA Ezimala (इंडियन नेव्हल अकॅडमी, एझिमाला) येथे आपल्या लष्करी प्रशिक्षणाला सुरुवात करणार आहे.

त्याच्या या प्रवासात त्याला त्याचे वडील लेफ्टनंट कमांडर रवींद्र काळे, काका साईप्रसाद काळे आणि वसमतमधील सुप्रसिद्ध व्यावसायिक श्री. अंकुश पटवे यांचे भक्कम मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले. त्याच्या या उत्तुंग यशामुळे त्याची आई वर्षा तसेच आजी-आजोबा ॲड. प्रभाकर आणि उर्मिला काळे यांना त्याचा सार्थ अभिमान वाटत आहे. आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत, त्याची बहीण तनुश्री ही देखील भारतीय हवाई दलात (Indian Airforce) सामील होण्याची आकांक्षा बाळगून आहे.

अथर्वने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, तसेच वसमत शहर आणि परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांकडून व समाज बांधवाकडून त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. अथर्वला भारतीय सशस्त्र दलातील (Indian Armed Forces) पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देऊन समाजबांधवां तर्फे सत्कार करण्यात

सचिन घारपूरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *