लेंढेझरी वनपरिक्षेत्रात भ्रष्टाचाराचा ‘वणवा’! कागदावर ४ ‘फायर वॉचर’, प्रत्यक्षात मात्र…; भंडारा DCF योगेंद्र सिंग कारवाई करणार का?
भंडारा:
वनविभागाच्या लेंढेझरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ‘मंगरली उत्तर राउंड’मध्ये शासकीय निधीचा प्रचंड अपहार आणि कर्तव्यात कसूर होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात थेट वरिष्ठ पातळीवर पुरावेनिशी तक्रार दाखल करण्यात आली असून, आता भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक (DCF) श्री. योगेंद्र सिंग या गंभीर घोटाळ्यावर काय ‘दणका’ देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.साकोली येथील वन समिती अध्यक्ष पर्वते यांनी आठ महिन्याच्या कालावधीपासून सागवान व इतर झाडांची 100 झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. या कत्तलीची तक्रार वन विभाग कार्यालय साकोली आर एफ ओ यांच्याकडे देण्यात आली, ती कारवाही शून्यच असल्याचे स्पष्ट होत आहेत, नंतर डी एफ ओ उपवनसंरक्षक अधिकारी भंडारा योगेंद्रसिंग यांना झाडांची कत्तल झाल्याचे दर्शविण्यात आले परंतु अधिकारी आपले संबंधित अधिकाऱ्याला वाचवणीच्या प्रयत्न करीत आहेत, धनविजय RFO तसेच RO राऊंड ऑफिसर हे सुद्धा तक्रार दिलेल्या दिनांकापासून संबंधित ठेकेदाराला तसेच शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत, साकोली RFO /RO यांनी झालं काढण्याची पहिल्यांदा परमिशन दिली,आणि एका महिन्यानंतर परमिशन रद्द करतोय याला पाठबळ कोणाचे, वन समिती अध्यक्ष साकोली पर्वते यांनी नागपूर वनसंरक्षण अधिकारी यांना पण पत्र देण्यात आले, 100 सागवान व इतर झाडे परमिशन अतिरिक्त काढणे शक्यच नाही, हा संपूर्ण भोंगळ कारभार आर एफ ओ तसेच आरओ यांचे आशीर्वादानेच कापण्यात आले. [1, 2, 3]
कागदी घोडे आणि बोगस पगार लाटण्याचा संशय: वर्ष २०२३-२०२४ या कालावधीत जंगलाच्या संरक्षणासाठी ४ फायर वॉचर नियुक्त करणे बंधनकारक होते. प्रत्यक्षात मात्र तिथे फक्त २ च फायर वॉचर कार्यरत होते. धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्षात काम न करणाऱ्या उर्वरित २ बोगस व्यक्तींच्या नावावरही पगार उचलून आर्थिक गैरव्यवहार (घोटाळा) करण्यात आल्याचा थेट आरोप आहे.
लेंडेझरी क्षेत्र सहाय्यकाची ‘दांडी बहाद्दारी’, जंगल वाऱ्यावर: क्षेत्र सहाय्यक (राऊंड ऑफिसर) श्री. कंगाली हे कर्तव्यावर नियमित हजर राहत नाहीत. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे त्यांच्या हाताखालील वनरक्षकही बेजबाबदार बनले असून, अमूल्य वनसंपदेचे संवर्धन आणि सुरक्षा धोक्यात आली आहे.
दैनिक अहवाल गायब, तरीही दरमहा भत्ता मंजूर: संबंधित क्षेत्र सहाय्यकांनी आजतागायत आपला दैनंदिन कामाचा अहवाल (डेली रिपोर्ट) कार्यालयात सादर केलेला नाही. असे असतानाही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी (RFO) त्यांना दरमहा १५००/- रुपये गस्त भत्ता कसा मंजूर केला आणि पगार कसा दिला? हा संगनमताने केलेला भ्रष्टाचार नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
🔥 जनतेचा सवाल: उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग ‘ॲक्शन मोड’मध्ये येणार का?
भंडारा जिल्हा हा निसर्गसंपन्न आणि संवेदनशील वनक्षेत्रासाठी ओळखला जातो. एकीकडे जंगलांचे रक्षण करण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करते, तर दुसरीकडे लेंढेझरी भागात अधिकाऱ्यांच्याच छत्राखाली शासकीय निधी लाटला जात असल्याचे या अर्जावरून स्पष्ट दिसत आहे. [1, 2]
यापूर्वी वनगुन्हे रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणारे उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग आता स्वतःच्याच विभागातील या ‘घरभेद्यांवर’ काय कारवाई करतात? या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय फौजदारी कारवाई होणार की भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातले जाणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया :-
उपवन संरक्षण अधिकारी भंडारा यांना लेंडेझरी येथील 4 महिन्याचे कालावधी लोटलेले असुन त्यात 4फायर वाचर लावलेले असुन तक्रारीचे पत्रात नमूद केलेल्या प्रमाणेच प्रतिक्रिया मागितले असता आम्ही ACF यांना चौकशी करण्या करिता सांगितले आहेत, ACF कडून काय चौकशी करण्यात आले तर पाहतोय.तसेच साकोली हदितील गिरोला जपानी येथील शेतकरी परवतेचे प्रकरण चे चौकशी चे आदेश ACF ला देण्यात आले आहेत,
(“श्री. योगेंद्र सिंग )उपवन संरक्षण अधिकारी भंडारा,
तक्रारदाराचे प्रतिक्रिया :
. लेंडेझरी वन परी क्षेत्रातील 4फायर वाचर लावणे अपेक्षित होते, परंतु राऊंड ऑफिसर यांनी 2 फायर वाचर लावण्यात आले. हि बाब 100% टक्के संशयस्पद आहेत, या बाबतीत वन विभागाचे समितीचे सचिव यांनी पत्र उप वन संरक्षक भंडारा श्री. योगेंद्र सिंग यांना देण्यात आले होते. 4 महिन्याचे कालावधी लोटला असुन अद्यापही कारवाही करण्यात आले नाही,
‘आर. टी. परतेती’ (सचिव, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी संघ, नागपूर) आणि ‘रवीकुमार तुळशीराम परतेती’ (रा. रोंघा). जिल्हा भंडारा.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
