मोगरा तलावात तोल जावून तरुणाचा मृत्यु देवलापार पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चोरबाहुली–मोगरा तलावात बुडून 58 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकरदयाल हरिराम शरणांगत वय 58 वर्ष रा. डोंगरी, पोस्ट भोंदेवाडा हे दिनांक 28 जुलै रोजी म्हशी चारण्यासाठी तलाव परिसरात गेले होते. यावेळी पाण्याची खोली लक्षात न आल्पाने त्यांचा तोल जाऊन ते तलावात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. अखेर दिनांक 29 जुलै रोजी सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह तलावाच्या किनाऱ्याजवळ आढळून आला.
मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली . या दुर्दैवी घटनेमुळे डोंगरी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून देवलापार पोलीस पुढील तपास करत आहेत.
सिटी इंडिया न्युज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम
