बजरंग दलाच्या प्रांत संयोजकपदी गजानन पांचाळ यांची नियुक्ती
नांदेड प्रतिनिधी जयप्रकाश गोणशेटवाड : बजरंग दलाच्या प्रांत संयोजकपदी गजानन पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या संघटनांमध्ये विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत हिंदुत्वाच्या कार्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
नांदेड जिल्ह्यात हिंदू समाजाच्या विविध प्रश्नांवर सक्रियपणे कार्य करत त्यांनी संकटमोचक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या दीर्घकालीन संघटनात्मक कार्याची दखल घेत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर नांदेड जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने गजानन पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
प्रतिनिधी. जयप्रकाश गोणशेटवाड नांदेड
