धडाकेबाज कामगिरी! गोंदिया एलसीबीने (LCB) आवळल्या अट्टल चोराच्या मुसक्या; ४ जिल्ह्यांतील ६ गुन्ह्यांची उकल!
गोंदिया:
‘गुन्हेगारांना सोडणार नाही’ हाच जणू विडा उचललेल्या गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पुन्हा एकदा आपली उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवून दिली आहे. पो.स्टे. अर्जुनीमोर अंतर्गत झालेल्या घरफोडीचा छडा लावत एलसीबीच्या पथकाने एका अट्टल चोराला अटक केली असून, त्याच्याकडून १,१८,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या धडक कारवाईमुळे गोंदिया पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आरोपी प्रवीण डेकाटे वय ३० वर्ष, रा. तिलक वॉर्ड मोहाडी,जिल्हा भंडारा यांना तात्काळ अटक करण्यात आले.
४ जिल्ह्यांतील गुन्ह्यांचे धागेदोरे उघड
पकडण्यात आलेल्या आरोपीने केवळ गोंदियाच नव्हे, तर भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा तब्बल चार जिल्ह्यांमध्ये घरफोडी आणि चोऱ्या करून धुमाकूळ घातला होता. मात्र, एलसीबीच्या चतुर आणि सतर्क पथकाने अत्यंत गोपनीय माहिती काढत, नागपूरमधून या आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या अटकेमुळे एकूण ६ गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कौतुक करावे तितके कमीच!
गोंदियाचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात संपूर्ण पथकाने – ज्यात सपोनि अमरदीप खाडे, पोहवा तुळसीदास लुटे, दुगर्स तिवारी, प्रकाश गायधने, दीक्षीतकुमार दमाहे, आणि सायबर सेलचे पो.शि. राकेश इंदुरकर यांसह इतर सर्व अंमलदारांनी – अहोरात्र मेहनत घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला.
कठीण आव्हानांचा सामना करत, अत्यंत व्यावसायिक पद्धतीने आणि वेगाने ही कारवाई पार पाडणाऱ्या एलसीबी गोंदियाच्या संपूर्ण टीमचे कौतुक करावे तितके कमीच आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळेच समाजात पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ होतो.
संपूर्ण पोलीस प्रशासनाचे व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐👏
गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
धडाकेबाज कामगिरी! गोंदिया एलसीबीने (LCB) आवळल्या अट्टल चोराच्या मुसक्या; ४ जिल्ह्यांतील ६ गुन्ह्यांची उकल!
