आदर्श माध्यमिक विद्यालय हिंगोली येथे ‘नशा मुक्त भारत प्रतिज्ञा संकल्प अभियान’ कार्यक्रम संपन्न’ 

आदर्श माध्यमिक विद्यालय हिंगोली येथे ‘नशा मुक्त भारत प्रतिज्ञा संकल्प अभियान’ कार्यक्रम संपन्न’

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

हिंगोली आदर्श एज्युकेशन सोसायटी, हिंगोली द्वारा संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय, हिंगोली येथे आज दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी ‘नशा मुक्त भारत प्रतिज्ञा’ हा अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. माधव जाधव सर होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी बी. के. अर्चना बहेन ( संचालिका, तपस्या भवन प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, गोविंद नगर, हिंगोली) तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अतिश कदम, सौ. पाटील मॅडम, बी. के. माधव राऊत भाई, बी. के. रेखा माताजी, बी. के. विजय गिरी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रथम अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अतिश कदम (इतिहास विभाग प्रमुख, न्यू माॅडेल डिग्री कॉलेज, हिंगोली) यांनी केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, भारताचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी ‘नशा मुक्त भारत प्रतिज्ञा संकल्प अभियान’ कार्यक्रमाची घोषणा केली. त्यावेळी त्या कार्यक्रमाला राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थित होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र प्रत्रक काढून हा कार्यक्रम घेणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे बी. के. अर्चना बहेन ( संचालिका, ‘तपस्या भवन’ प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय गोविंद नगर हिंगोली येथे दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी ‘नशा मुक्त भारत प्रतिज्ञा अभियान’ या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. व आज आपल्या आदर्श माध्यमिक विद्यालयात हा कार्यक्रम आज घेत आहोत. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी बी. के. अर्चना बहेन (संचालिका, ‘तपस्या भवन’ प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय गोविंद नगर हिंगोली) यांनी ‘नशा मुक्त भारत प्रतिज्ञा’ या अभियानाचे महत्व पटवून देताना मनूष्यामध्ये असलेल्या चांगल्या व वाईट व्यसनांची माहिती देऊन प्रत्येक मनुष्याने चांगले व्यसन करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी उपस्थित सर्वांना ‘नशा मुक्त भारत प्रतिज्ञा’ दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. माधव जाधव सर यांनी अध्यक्षीय समारोप करताना ‘नशा मुक्त भारत प्रतिज्ञा’ या अभियानाचा मुळ उद्देश स्पष्ट करुन सांगितला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एन. के. सरकटे व आभार प्रदर्शन प्रा. शितल कोंडावार यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *