नऱ्हे पोलीस स्टेशन पुणे तपास पथकाची धडक कारवाई; आरोपींना शस्त्रांसह ठोकल्या बेड्या
सदर गुन्ह्यातील अटक आरोपी नामे करण शिवाजी जामदार याच्याकडे अधिक बारकाईने व कसोशीने तपास करीत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण, पोलीस अंमलदार नितीन वाघमारे, पोलीस अंमलदार राजु तोरे यांना सदर आरोपींकडे अजून अवैधरित्या अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली, पोलिसांनी सदर आरोपीला पोलीसी खाक्या दाखवताच सदर आरोपी त्यांचे जवळ असलेले अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसे त्याचा मित्र समीर कालींदर शेख वय २८ रा. चारवाडा साई कॉर्नर केशवनगर मांजरी बुद्रुक रोड हडपसर . ओंकार नारायण गाडेकर वय २३ रा. चारवाडा, धनश्री बालाजी ट्रेडर्स केशवनगर मांजरी बुद्रुक रोड हडपसर यांच्याकडे दिले असल्याचे असून दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सांगितले असता सदर आरोपींचा तपास पथकामधील पोलिसांनी कसून शोध घेऊन शिताफीने ताब्यात घेतले सदर आरोपींकडून अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुस ताब्यात घेऊन गुन्ह्याचे पुरावे कानी जप्त करण्यात आलेले आहेत.
प्रतिनिधी – संदिप पांचाळ
