*सावनेरमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी*.
13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी चार वाजता सावनेर विश्राम गृह च्या सभागृहात महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांच्या लोककल्याणकारी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.
स्थानिक विश्रामगृहाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रा. बाबा टेकाडे होते.
मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनीही अभिवादन केले.
यावेळी दिनेश इंगोले, भगवान चांदेकर, संजय टेंभेकर, यशवंत पाटील, गुलाब टेकाडे, संजय राऊत, अतुल राऊत, ज्ञानेश्वर गोहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
अहिल्यादेवींनी प्रजाहिताला सर्वोच्च स्थान देत आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ निर्माण केला. त्यांचे लोककल्याणकारी कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रा. बाबा टेकाडे यांनी सांगितले.
अहिल्यादेवींच्या विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प समाजबांधवांनी केला.
प्रसंगी सावनेर तालुक्यातील विविध गावांमधील समाजबांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शुभम ढवळे यांनी केले, तर यशवंत पाटील यांनी आभार मानले.
लोककल्याण, न्याय आणि समाजसेवेचा आदर्श पुढे नेण्याचा संदेश देत सावनेरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
सावनेर तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे
