धडक कारवाईचे ‘तुमसर पॅटर्न’: २ महिन्यांत अवैध धंद्यांचे कंबरडे मोडणारे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांचे सर्वत्र कौतुक;

धडक कारवाईचे ‘तुमसर पॅटर्न’: २ महिन्यांत अवैध धंद्यांचे कंबरडे मोडणारे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांचे सर्वत्र कौतुक;

 

भंडारा:कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना वेळीच चाप लावण्यासाठी तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुभाष बारसे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गेल्या दोन महिन्यांत अवैध धंद्यांविरुद्ध अत्यंत कठोर आणि धडक मोहीम राबवली आहे. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे केवळ तुमसर परिसरातच नव्हे, तर संपूर्ण भंडारा जिल्ह्यात तुमसर पोलिसांचा नावलौकिक कमालीचा वाढला आहे.दिनांक ०१/०६/२०२६ ते २१/०८/२0२६ या अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत पोलीस निरीक्षक बारसे यांच्या नेतृत्वाखाली जुगार, अवैध दारू विक्री, अवैध रेती वाहतूक आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विरोधात सातत्याने छापे टाकून गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडले आहेत.लाखोंचा मुद्देमाल जप्त; गुन्हेगारांना दणकाया मोहिमेदरम्यान तुमसर पोलिसांनी केलेली कामगिरी जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरली आहे:रेती चोरीवर अटकाव: रेती चोरीप्रकरणी एकूण १७ गुन्हे दाखल करून २४ आरोपींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये रेती आणि वाहनांसह तब्बल १,३३,८१,०००/- रुपयांचा (१ कोटी ३३ लाख) प्रचंड मुद्देमाल जप्त करण्यात आला.अवैध दारूबंदी मोहीम: दारूबंदी कायद्यान्वये तब्बल ३७ गुन्हे दाखल करत ३९ आरोपींना बेड्या ठोकल्या आणि १४,५८,४५०/- रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त केला.जुगार अड्ड्यांवर छापे: जुगाराच्या २० प्रकरणांमध्ये २९ आरोपींवर कारवाई करून ५४,३२२/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सुगंधित तंबाखूवर बंदी: प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त करत ३ गुन्ह्यांमध्ये ४ आरोपींवर कारवाई केली आणि १,३९,९२२/- रुपयांचा माल जप्त केला.तडीपार आणि ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कडक कारवाईगुन्हेगारांवर केवळ गुन्हे दाखल न करता, त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक बारसे यांनी कायद्याचा कडक बडगा उचलला आहे. मपोका कलम ५५, ५६, ५७ अन्वये एकूण ७ प्रस्ताव मंजूर करून गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच, सराईत गुन्हेगारांविरुद्ध थेट एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये प्रभावी प्रतिबंधक कारवाई करून ४ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि जनतेचे सहकार्य पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवून गुन्हेगारीमुक्त तुमसरचा संकल्प केला आहे.अवैध धंद्यांचे कंबरडे मोडणाऱ्या आणि जिल्ह्याला एक आदर्श पोलीस प्रशासनाचा वस्तूपाठ घालून देणाऱ्या पोलीस निरीक्षक सुभाष बारसे आणि त्यांच्या टीमचे नागरिकांकडून जोरदार स्वागत व कौतुक होत आहे. भविष्यातही अशा कारवाया सुरूच राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला असून नागरिकांनी कोणत्याही अवैध व्यवसायाची माहिती त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *