बडूर नगरीच्या दोन भूमिपुत्रींनी NEET परीक्षेत यश संपादन करून MBBS प्रवेश मिळविला; गावाच्या उज्ज्वल भविष्याची नवी दिशा
बडूर (ता. _____ बिलोली_) : बडूर नगरीतील दोन होतकरू विद्यार्थिनींनी. राशी विठलसिंह चौव्हाण व अनुष्का लक्ष्मण मुंडकर हे दोन मुली आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर NEET परीक्षा उत्तीर्ण करून MBBS अभ्यासक्रमासाठी दोनी मुलीना पुणे येथे प्रवेश मिळविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण बडूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, गावातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक आदर्श आणि प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या दोन्ही विद्यार्थिनींचे यश हे केवळ त्यांच्या कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण बडूर गावासाठी अभिमानाची बाब आहे. “मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते,” हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे.
त्यांच्या या यशामुळे बडूर गावातील मागील पिढीतील विद्यार्थ्यांसह सध्याच्या आणि येणाऱ्या पिढीतील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची नवी प्रेरणा मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असा सकारात्मक संदेश त्यांच्या यशातून मिळत आहे.
गावातील पालकांनी आपल्या मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या गुणवत्तेला आणि स्वप्नांना योग्य दिशा द्यावी. विशेषतः मुलींनी शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे येऊन विविध उच्च शिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा, यासाठी या दोन्ही विद्यार्थिनींचे यश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
बडूर गावच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक आशादायी सुरुवात असून, त्यांच्या यशाची प्रेरणा घेऊन गावातील येणारी पिढीही शिक्षण, स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींचे गावच्या वतिने मनःपूर्वक अभिनंदन! करताना दिसून येत आहे त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यांनी भविष्यात उत्तम डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, हीच सदिच्छा.असे सरपंच सौ चेतना जाधव उपसरपंच जगन्नाथ गुजरवाड पोलीस पाटील हनुमंतराव जाधव बडूर नगरीचे ज्येष्ठनागरीक बाबुसिंह चौव्हाण. विठल पांचाळ वीरभद्र मठपती माजी सरपंच वसंतराव पाटील राम भंडारे.विठ्ठल दावलेकर. मारोती जाधव. रमेश मुंडकर.सामाजिक कार्यकर्ता योगाजी दावलेकर. इत्यादीने सिटी इंडिया न्यूज बोलताना राशी चौव्हाण. व अनुष्का मुंडकर यांना शुभेच्छा दिले.
प्रतिनिधी, जयप्रकाश गोणशेटवाड नांदेड
