बोरी येथे पावसासाठी विशेष नमाज व सामूहिक दुआ.प्रतिनिधी. मनोज टाक बोरी
“दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकरी, पशुपालक चिंतेत;
बोरी, दि. ९ सप्टेंबर : जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरात पावसाने दांडी मारल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुधवार, रोजी ईदगाह मैदानावर नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहून पावसासाठी सामूहिक नमाज तसेच दुआ करण्यात आली.यावेळी हाफिज मोबीन यांनी नमाज अदा केली ,तर मौलाना कलीमोद्दीन यांनी विशेष दुआ केली. परिसरात मुबलक पाऊस पडावा, शेती-पिकांना दिलासा मिळावा, जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, यासाठी उपस्थित सर्वांनी मनोभावे दुआ केली.यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग चिंतेत आहे , जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी हिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुधनाच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ईदगाह मैदानावर नमाज-ए-इस्तिस्काचे आयोजन करण्यात आले. यावेळी मौलाना मकसूद यांनी नमाज-ए-इस्तिस्काचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की,प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या काळातही पावसाअभावी अशी परिस्थिती निर्माण झाल्यास ही नमाज अदा करून पावसासाठी दुआ केली जात असे. त्यामुळे सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत सर्वांनी प्रार्थना करावी असे आवाहन त्यांनी केले.मौलाना उस्मान यांनी पुढे सांगितले की, नमाज-ए-इस्तिस्का सलग तीन दिवस अदा करण्यात येणार आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीनही दिवशी होणाऱ्या नमाज-ए-इस्तिस्कामध्ये समाजातील सर्व बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि पावसासाठी मनोभावे दुआ करावी, असे आवाहन करण्यात आले परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, शेतीला दिलासा मिळावा, जनावरांसाठी मुबलक चारा उपलब्ध व्हावा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा, यासाठी नमाज अदा करण्यात आली .यावेळी हाफेज इलाही, मौलाना उस्मान, मौलाना जैद , मौलाना फैसल, मौलाना मोईन, माजी उपसरपंच रफिक शेख यांच्यासह बोरी परिसरातील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.आयोजनासाठी सदर पाशा शेख, नायब सदर सय्यद खिजर,शेख इरफान, अजीमोद्दीन अन्सारी, इरशाद शेख अली तसेच सर्व मर्कज कमिटी सदस्यांनी आवश्यक नियोजन करून सहकार्य केले. मैदानाची व्यवस्था, उपस्थितांसाठी आवश्यक सोयी आणि नमाज सुरळीतपणे पार पडण्यासाठी कमिटीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.दरम्यान पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. “अल्लाहने रहमतचा पाऊस बरसवावा, शेतशिवार हिरवेगार व्हावे आणि दुष्काळसदृश परिस्थिती दूर व्हावी,” अशी भावना व्यक्त करत उपस्थितांनी सामूहिक दुआ केली”
