सोयगाव येथे माहिती अधिकार कार्यकर्त्यांची कार्यशाळा उत्साहात
माहितीच्या अधिकाराचा प्रभावी वापर करण्याचे शेख गुलाब मामू याचे मार्गदर्शन
तालुका सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगाव, दि. १२ सप्टेंबर (लो सं) : नागरिकांना शासकीय प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा हे प्रभावी माध्यम असून, त्याचा योग्य आणि कायदेशीर पद्धतीने वापर करण्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्त्यांची कार्यशाळा आज सोयगाव येथे उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेत माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत अर्ज कसा करावा, कोणत्या कार्यालयाकडे माहिती मागावी, माहिती न मिळाल्यास प्रथम व द्वितीय अपीलाची प्रक्रिया कशी करावी, तसेच माहिती अधिकाराचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत उपस्थित माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी विविध शासकीय विभागांकडून माहिती मिळविताना येणाऱ्या अडचणी, अपूर्ण माहिती आणि विलंब यासंदर्भात चर्चा केली. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.28 सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येणार आहे
कार्यक्रमा चे अध्यक्ष शेख रशीद तर माहिती अधिकार बाबत मार्गदर्शन शेख गुलाब मामू होते या कार्यशाळेमुळे माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती होऊन कार्यकर्त्यांना अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.या कार्यक्रमाला संदीप इंगळे दिलीप शिंदे ईश्वर इंगळे विजय पगारे वाल्मीक चव्हाण अशोक ढगे शेख सुलेमान ज्ञानेश्वर गाडेकर विजय भारवाड आदी सह सोयगाव परिसरातील माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने कार्यशाळेत सहभागी झाले.
