तोंडापूरच्या जैन विद्यालयात पर्यावरण पूरक श्री चे विसर्जन

तोंडापूरच्या जैन विद्यालयात पर्यावरण पूरक श्री चे विसर्जन

———————————

 

प्रतिनिधी संतोष गर्दे

 

 

तोंडापूर ता जामनेर

येथील श्रीमती र सु जैन माध्यमिक विद्यालयात इको फ्रेंडली पद्धतीने तीन दिवसाच्या श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले श्री ची स्थापना वसतिगृह अधीक्षक संजय पोस्ते यांच्या हसते करण्यात आली होती .

पर्यावरण पूरक अशा शाडू मातीपासून बनविलेल्या श्री च्या मूर्तीची शाळेच्या आवारात वाजत गाजत ढोल तशाच्या गजरात मिरवणूक काढत तीन दिवसांच्या श्री चे शाळेच्या आवरातच एका टाकी मध्ये विसर्जन करण्यात आले व विरघळलेले पाणी झाडांना टाकण्यात आले यावेळी मुख्याध्यापक पी डी रोनखेडे पर्यवेक्षक के एस माळी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी शाळेचे संगीत शिक्षक आर सी लोडते यांनी श्री गणेशाची आरती म्हटली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *