पोलीस स्टेशन महागाव येथून एक महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन महागाव येथून एक महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

 

पोलीस निरीक्षक श्री. सेवानंद वानखडे साहेब यांनी महागाव शहर व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणीही गांजा, एमडी किंवा इतर अमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा सेवन करत असल्याचे दिसल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.

 

अमली पदार्थांमुळे युवकांचे व विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असून समाजावरही त्याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे अमली पदार्थमुक्त समाजासाठी पोलिसांना सहकार्य करा.

 

माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल व त्याच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल.

 

संपर्कासाठी मोबाईल क्रमांक – 8766065335

 

निर्भयपणे माहिती द्या आणि युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवा.

 

सेवानंद वानखडे, पोलीस निरीक्षक, महागाव

संपर्क सदा.8766065335

 

तालुका प्रतिनिधी – बबलू उर्फ मोहम्मद शेख, संपर्क क्रमांक. 9067934036

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *