*मोठ्या चोरीचा गुन्हा अवघ्या २ तासांत उघड; मोहपा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी*
मोहपा, नागपूर ग्रामीण : मोहपा पोलीस स्टेशनच्या पथकाने चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादी महिला कामानिमित्त बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान आरोपीने त्यांना गावापर्यंत सोडण्याचे सांगून दुचाकीवर बसवले. त्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन फिर्यादीच्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवी व हातातील पर्स चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
*या प्रकरणी मोहपा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.* गुन्हे शोध पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेतला.
*या प्रकरणात राकेश श्रावणजी मरसकोळे (वय ३५, रा. हेटी आकौली, ता. सेलू, जि. वर्धा; सध्या सतनवरी बाजारगाव, ता. काटोल, जि. नागपूर) याला अटक केल्याची माहिती* प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहपा पोलिसांनी केली. चोरीच्या गुन्ह्याचा अल्पावधीत तपास लावल्याने पोलिसांच्या कामगिरीची नोंद घेण्यात आली आहे.
*रिपोर्टर : जयश्री चव्हाण*
*CT INDIA NEWS*
