प्रजाराष्ट्र मोर्चाच्या पाठपुराव्याला अखेर यश!
बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा; ५२ किलोऐवजी ५१ किलोचा कट्टा करण्याच्या सूचना
बिलोली प्रतिनिधी | जयप्रकाश गोणशेटवाड
बिलोली : बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांची आडत व्यापाऱ्यांकडून होत असलेली कथित लूट आणि शेतकऱ्यांवर होणारा अन्याय लक्षात घेऊन प्रजाराष्ट्र मोर्चाने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून हा मुद्दा वरिष्ठ स्तरावर मांडत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांनंतर २७ ऑक्टोबर रोजी बिलोली तालुका आडत व्यापारी असोसिएशनकडून व्यापाऱ्यांसाठी सूचना जारी करण्यात आल्या असून, ५२ किलोऐवजी ५१ किलोचा कट्टा करण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
१५ ऑक्टोबर रोजी प्रशासनाला दिले होते निवेदन
बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रजाराष्ट्र मोर्चाचे संपादक-अध्यक्ष गौतम भालेराव, सहसचिव कमलाकर पाटील जमदाडे, कार्याध्यक्ष मोहन मारुती जाधव, अध्यक्ष राजकुमार गादगे, नामदेव पाटील कल्याणकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
दिनांक १५ ऑक्टोबर रोजी बिलोली तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच मार्केट कमिटी येथे निवेदन देऊन आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा मुद्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या मालाला योग्य न्याय मिळावा आणि त्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रसारमाध्यमांतूनही प्रश्नाला वाचा
शेतकऱ्यांचा हा प्रश्न केवळ निवेदनापुरता मर्यादित न ठेवता,
