26जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर उत्तर महाराष्ट्र तेली समाज मंडळाने आयोजित स्नेहसंमेलन संपन्न
- CT INDIA NEWS

- Jan 28, 2020
- 1 min read

वार्ताहार-गणेश चौधरी(औरंगाबाद) !!जय संताजी!!
आज 26 जानेवारी च्या मुहूर्तावर आपल्या उत्तर महाराष्ट्र तेली समाज मंडळाने आयोजित केलेल्या स्नेह संमेलनास सर्व समाज बांधव व
माताभगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.
तसेच महिलामडळाने हळदी कुंकू सोबत पैठणी व बालगोपालांनी लकी ड्रॉ चा आनंद घेतला विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री येस. के.दादांनी जवळ जवळ 15 वर्षांपासून सर्व समाज बांधवाना एकत्र बांधून ठेवले व मोलाचे मार्गदर्शन केले आणि पुढेही असेच मार्गदर्शन करतील याची खात्री आहे नूतन मंडल तर्फे आभार.🙏
तसेच गरुडझेप अकॅडमी चे संचालक श्री येस येस सोनवणे सरानी विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले त्या बद्दल त्यांचेही आभार.
तसेच नवीन कार्यकारी अध्यक्ष श्री पी.येन .चौधरी आप्पा यांनीही सर्वानुमते नवीन कार्यकारी मंडळाची धुरा सांभाळली म्हणून त्यांचेही आभार.
तसेच जेष्ठ समाज बांधव श्री.अशोक चौधरी, श्री.रामदास हिंगे,श्री.पी.के.सोनवणे,श्री.प्रल्हाद चौधरी यांचेही मंडला च्या वतीने आभार.
तसेच ज्या समाज बांधवांनी स्व इच्छेने देणगी दिली त्यांचेही आभार.
तसेच सर्वांना सुंदर जेवण बनवून दिले ते श्री.योगेश केले आणि रणजी हॉल चे मालक युवराज यांनी कमी पैशात हॉल ची सुंदर व्यवस्था करून दिली त्या बद्दल त्यांचे ही आभार.
असेच समाजाच्या पुढील कार्यक्रमास भरभरून पाठींबा दाखवा म्हणजे आमचा उत्साह आजून द्विगुणित होण्यास मदत होईल
विनीत: कार्यकारी मंडळ
उत्तर महाराष्ट्र तेली समाज मंडळ औरंगाबाद.







Comments