top of page

*गावठी कट्यासह तरुणाला अटक ग्रामीण पोलीसांची का

  • Writer: CT India News
    CT India News
  • Apr 5, 2022
  • 1 min read

चाळीसगाव त्ता. प्रतिनिधी : विकी पानकर

*गावठी कट्यासह तरुणाला अटक ग्रामीण पोलीसांची कारवाई*


चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावात बेकायदेशीर गावठी बनावटीचा पिस्तूल स्वतः जवळ बाळगल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली . त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता जिवंत काडतुसासह तरूणाला अटक केली आहे . सविस्तर माहिती अशी की , चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोउनि लोकेश पवार यांना सोमवार रोजी गुप्त माहिती मिळाली की , तालुक्यातील वाघळी गावात जुन्या चांभार्डी रोडलगत बेघर वस्तीमध्ये बेकायदेशीर गावठी बनावटीचा पिस्तूल व जिवंत काडतुस एकाने स्वतः जवळ बाळगल्याची गुप्त माहिती मिळाली . त्यावर पोना गोवर्धन बोरसे , पोना नितीन आमोदकर , पोना शांताराम पवार ,

पोहेकॉ दत्तात्रय महाजन , पोना जयंत सपकाळे अशांनी सदर ठिकाणी छापा टाकून गावटी बनावटीचे पिस्तूल , तीन जिवंत काडतूस असे एकूण २६ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला . आकाश अमृत शिरसाठ ( वय २८ ) रा . वाघळी ता . चाळीसगाव असे अटक केलेल्या आरोपी तरूणाचा नाव आहे . व्हाटसअपवर बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करा सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ . प्रविण मुंढे , अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे , पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , पोलीस निरीक्षक के . के . पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश चव्हाण , सपोनि धरमसिंग सुंदरडे , पोउनि लोकेश पवार , पोना गोवर्धन बोरसे , पोना नितीन आमोदकर , पोना शांताराम पवार पोहेकॉ दत्तात्रय महाजन ,पोना जयंत सपकाळे अशांनी केली आहे . पोना जयंत सपकाळे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे . पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण व पोना शांताराम पवार हे करीत आहेत .

Comments


bottom of page