शेंदुर्णीत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन, यंदाचे १०१ वे वर्ष शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी खान्
- CT India News
- Mar 30, 2022
- 1 min read
शेंदुर्णीत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन, यंदाचे १०१ वे वर्ष
शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी
खान्देशातील विख्यात संतकवी आणि भगवत् भक्त वै.भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व वै.गोविंदराव पारळकर यांच्या अथक परिश्रमाने तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असलेल्या येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे यंदा आयोजन करण्यात आले असुन उत्सवाचे यंदाचे हे १०१ वे.वर्ष आहे.
यानिमित्ताने दररोज हरि कीर्तन, भजन,जन्माचे कीर्तन, पालखी मिरवणुक आदी कार्यक्रम आहे.
चै.शु.प्रतिपदा दि.२/४/२०२२ शनिवार ते चै.शु.अष्टमी .दि.९/०४/२०२२ शनिवार पावेतो दररोज रात्री ८-३० वाजता मराठवाडा किर्तनरत्न ह.भ.प.सुनील महाराज आष्टीकर सेलु (परभणी ) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असुन त्यांना कृष्णा लिंबेकर परभणी हे हार्मोनियम वर तर तबल्यावर श्रीनिवास कुलकर्णी औरंगाबाद हे साथ संगत करणार आहे.
चै.शु.नवमी दि.१०/०४/२०२२ रविवारी सकाळी १० वाजता संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस ह.भ.प.शांताराम महाराज भगत यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे जन्माचे कीर्तन होणार असुन यावेळी ह.भ.प.वारकरी संप्रदाय भजनी मंडळ यांची साथ संगत लाभणार आहे. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा व प्रसाद वितरण होईल. रात्री ८ वाजता श्री ची भव्य पालखी मिरवणुक शहरातुन निघणार असुन यात वारकरी संप्रदाय भजनी मंडळ हरिपाठ महिला भजनी मंडळ शेंदुर्णी तसेच ग्रामस्थ यांचे सहकार्य व सहभाग असतो.
तरी या कार्यक्रमात सर्व भाविक सज्जनांनी या जन्मोत्सवात भाविकतेने सहभागी होऊन उदारतेने आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन चालक श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी यांनी केले आहे.
Comments