top of page

*येथील जंगलात घुसून अवैद्य डिंक काढणारे आरोपी , महिला वनाधिकार्‍यांच्या धाडसाने झाले जेरबंद...!*

  • Writer: CT India News
    CT India News
  • Apr 13, 2022
  • 1 min read

*येथील जंगलात घुसून अवैद्य डिंक काढणारे आरोपी , महिला वनाधिकार्‍यांच्या धाडसाने झाले जेरबंद...!*



चाळीसगाव ता.प्रतिनिधी :- विकी पानकर


येथील औरंगाबाद वन विभागांतर्गत येणाऱ्या चाळीसगाव वनपरिक्षेत्रातील जुनोना अभयारण्यातील जंगलात अवैधरित्या प्रवेश करून झाडांची कत्तल , तथा डिंकाची चोरी असे अनेक प्रकार घडत असल्याचे येथील वनपरिक्षेत्राचे अधिकारी ज्ञानेश्वर देसाई साहेब यांना मिळत असे , तसेच आजही गुप्तबातमीदारा द्वारे यांना डिंक चोरीची बातमी मिळाली होती ,


देसाई यांनी गुप्त बातमीच्या आधारे सापळा रचत डिंक चोरी साठी आलेले बहादूर तडवी ऑपे रिक्षा चालक , त्यासह साथीदार तुराब तडवी , अमजद तडवी , धुरसिंग बारेला , यांच्यासह ऑपेरिक्षा क्रं. एम.एच.१९ बीजे २८०६ व धावडा वृक्षांवरील चोरीचा डिंक , वरिष्ठांच्या आदेशानुसार जुनोना वनपरीक्षेत्र येथील महिला वनरक्षक माधुरी वसंत जाधव यांनी व त्यांचे पती राहुल भीमराज जाधव या दोघांनी आरोपींना पकडून आपल्या टीमला कळवत शिताफीने आरोपींना अटक केली. घनदाट जंगलाचा फायदा घेत यांच्यातील २ आरोपी फरार झाले आहेत. तर उर्वरित चारही आरोपींना मा. प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले असता , त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली असून फरार दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

याकामी चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई साहेब, वनपाल डी. के.जाधव बोढरा , माधुरी वसंत जाधव जुनोना, वनरक्षक ए.जे जाधव बोढरा,राहुल जाधव सह रोजनदारीने मजुरी करणारे कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका घेत , संबधीत आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

वनविभागाच्या या कारवाईने व महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईने सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे..!

Comments


bottom of page