3 डिसेंबर रोजी औरंगाबादेत भव्य दिव्य अपंग दिन
- CT INDIA NEWS

- Dec 3, 2019
- 1 min read

वार्ताहर - मनीष मुथा - लासूर स्टेशन. ,3 डिसेंबर रोजी औरंगाबादेत होणार भव्यदिव्य असा जागतिक अपंग दिन साजरा.... महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटना मुंबई 32 या संघटना जिल्हा औरंगाद च्या वतिने जोरदार तयारी करण्यात आली असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रातील तमाम अपंगाचे र्हदयसम्राट दिगंबररावजी घाडगे पाटील व अपंगाचे प्रेरणास्थान तथा साईनाथजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादचे जिल्हा अध्यक्ष आर.आर.पाटील सर व जिल्हा सचीव विजय शेळके सर व टीम औरंगाद च्या वतीने जय्यत तयारी करण्यात आले.शहरातील मौलाना आझाद संशोधन सभागृह टिव्ही सेंटर हडको औरंगाबाद येथे पार पडणार आहे..या कार्यक्रमात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत विशेष म्हणजे नेत्रदान संकल्प सोहळा घेण्यात येणार आहे. व दिव्यांग कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्यासाठी तालुक्यातुन एक गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार व गुणवंत पाल्य पुरस्कार वितरण करण्यात येत आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष औरंगाबादचे जिल्हाधिकारी माननीय श्री उदय चौधरी साहेब यांच्या हस्ते वितरण होणार आहे.तसेच अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत..तरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांंग कर्मचार्यांना उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात येत आहे .आणी सर्व विभागातील दिव्यांग कर्मचार्यांना उपस्थित राहता यावे म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी विशेष किरकोळ रजा मंजूर करण्यात आली आहे.







Comments