72 वर्षाच्या शेतकऱ्याने बनविला चित्रपट
- CT India News
- Jan 30, 2022
- 1 min read
72 वर्षाच्या शेतकऱ्याने बनविला चित्रपट
सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी नरेश पुनकर सावरा (अकोला)
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद या गावातील गणपतराव म्हैसने या 72 वर्षांच्या शेतकऱ्याचे ,गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात, हा चित्रपट बनवून तरुणांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे .हा चित्रपट लवकरच राज्यातील विविध चित्रपटा मध्ये झळकणार असल्याची माहिती गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. तरुणपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या गणपत म्हैसने यांनी विविध नाटकांमधून छोट्या भूमिका साकारून प्रेक्षकांची दाद मिळविली आहे परिस्थिती व वाढत्या जबाबदाऱ्या मुळे ते या आवडीचे रूपांतर करिअरमध्ये करू शकले नाही, परंतु कलेची धग त्यांनी कायम ठेवली .उतारवयात जबाबदाऱ्या कमी झाल्यामुळे स्वतःची स्वप्नपूर्ती करत ,गाव गोत्यात 15 लाख खात्यात, या चित्रपटाची निर्मिती केली निखळ मनोरंजन असलेला हा चित्रपट सहकुटुंब पहावा असे आव्हान यावेळी करण्यात आले .पत्रकार परिषदेत गणपतराव देशमुख दिग्दर्शक शुभम रै, प्रशांत चंद्रिकापुरे ,कलाकार डॉक्टर विलास उजवणे, चांदणी पाटील, त्रिग्या चंद्रिकापुरे ,जयंत वंजारी, रंगराव घागरे, संजीवनी जाधव , विराग जाखड,प्रिया गमरे,प्रकाश भागवत आदी उपस्थिती होती









Comments