top of page

75 व्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य शोभा यात्रा

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Feb 16, 2020
  • 1 min read

ree

वार्ताहार-प्रवीण कापुरे -शेंदूरण शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि. शेंदुर्णी.ता.जामनेर जि. जळगांव संस्थेच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त डॉ. नि. सु.(जैन)ब्रम्हेचा माध्यमिक विद्यालय विटनेर ता.जि. जळगांव शाळेत भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. याप्रसंगी सौ. निर्मलाताई कोळी(पं. स. सदस्य जळगांव), श्री चावदस आप्पा कोळी(सरपंच विटनेर) श्री. ए. ए. पटेल सर(संपर्क अधिकारी शेंदुर्णी एज्युकेशन),रमेश परदेशी, मनिष घाडगे,सदाशिव गवांदे,दिपक परदेशी,देवराम गोलांडे यांनी कार्यक्रमास हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाचे उदघाटन केले.कार्यक्रम उत्कृष्ट सादर व्हावा यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत गरुड सर,शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी चांगले परिश्रम घेतले.भव्यदिव्य शोभा यात्रेस गावातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करून ग्रामस्थांना प्रभावित केले.

Comments


bottom of page