Article 370 : कलम ३७०: “मोदी तुम्ही तर कमाल केली, तुम्ही देशाच्या अपेक्षा पूर्ण केल्या”
- CT INDIA NEWS

- Aug 5, 2019
- 1 min read

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत काश्मीरच्या विषयावर निवेदन केले. त्यांनी जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. 370 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (सोमवारी) संसदेत काश्मीरच्या विषयावर निवेदन करताना जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. अमित शाह यांनी ही शिफारस मांडताच संसदेत मोठया प्रमाणावर गदारोळ झाला. मागच्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर सैन्यबळ वाढवण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला या दोघांनाही नजरकैद करण्यात आले. अमित शाह यांनी ही शिफारस मांडल्यानंतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर याच प्रकरणावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपाचे प्रवक्ते शाहनवाझ हुसैन यांनी ट्विटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले आहे.'पतंप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही तर कमाल केलीत. तुम्ही देशाच्या अपेक्षा पूर्ण केल्या. कलम ३७० संदर्भात घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयासाठी मोदीजी आणि अमित शाहजींचे अभिनंदन. या निर्णयामुळे जम्मू- काश्मीरच्या प्रगतीची दारे उघडली आहेत,' असं ट्विट हुसैन यांनी केले आहे.







Comments