VSTF निधीतून ग्रामपंचायतीत पुस्तके वाटप..
- CT INDIA NEWS

- Nov 28, 2019
- 1 min read

वार्ताहार-धिरज पाटील (नंदाळे बु)महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट असलेलया नंदाळे बु ग्रामपंचायतीत आज पुस्तकालयाचे अनावरण करण्यात आले..विविध विषयांचे पुस्तके यावेळी ग्रामपंचायतला VSTF निधीतून उपलब्ध करून देण्यात आली..स्पर्धपरिक्षा चे महत्व लक्षात घेता गावातील अभ्यासू युवकांसाठी ही पुस्तके महत्वाची असल्यामुळे ती उपलब्ध करून देण्यात आली..या पुस्तकालयात प्रसिद्ध कादंबऱ्या, दर्जेदार स्पर्धा परीक्षा पुस्तके, आरोग्य पुस्तके इ. उपलब्ध आहेत. तरी होतकरू व अभ्यासू व्यक्तींनी, विद्यार्थीनी नक्कीच याचा फायदा घावा. यावेळी सरपंच श्री योगेश पाटील, ग्रामसेवक, भुपेंद्र ठाकूर, धनराज पाटील, विशाल पाटील, व ग्रामपरिवर्तक किरण बच्छाव उपस्थित होते.. नंदाळे बु गाव हे महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट आहे..







Comments