अखिल भारतीय तेली समाज संघटना व वर वधू सूचक मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या बैठक संपन्न
- CT INDIA NEWS

- Sep 16, 2020
- 1 min read

प्रतिनिधी- गणेश चौधरी
अखिल भारतीय तेली समाज संघटना व वर वधू सुचक मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या राज्य कार्यकारिणी ची बैठक दिनांक 10/9/2020रोजी संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. श्री.दिलीपजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे घेण्यात आली होती.प्रथम समाज दैवत संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करून बैठकीला सुरवात झाली.त्यात नागपूर जिल्हा व शहर येथे समाजातील विविध कल्याणकारी योजना समाजापर्यंत पोहचवने , शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे ,गरिब व हुशार होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणे ,जवाहर वस्तीगृह नागपूर च्या माजी संचालक, महानगरपालिका येथे प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या, तसेच करोना या रोगाची प्रतिबंधक उपाययोजनाची रोज दुपारी 4ते7या वेळेत मोफत सेवा देणार्या अशा सर्व परिचीत आ.डाॅक्टर विजयाताई बालपांडे यांची संस्थेच्या
नागपूर जिल्हा " सल्लागार " पदावर नियुक्ती करण्यात आली.बैठकीमध्ये सर्वश्री राहुलजी भिसे सचिव,सचिन देशमाने प्रदेश कार्याध्यक्ष, गणेशजी भिसे उपाध्यक्ष,सुधीर भिसे प्रशिद्धी प्रमुख,अरूण धांडे, प्रविण सेलोकर , किशोर साखरवाडे,परागं भस्मे, वासुदेवराव वंजारी,राजेश कारमोरे , दिपीका ताई जयपुरकर, नंदा ताई साठवणे,योगिता रेंगे,किरण बांरई , वैशालीताई बालपांडे, नंदाताई साठवणे इ.प्रमुख्याने उपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शन प्रविणजी सेलोकार यांनी केले व राष्ट्रगितांनी कार्यक्रम ची सांगता झाली.







Comments