अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या कारवाईत आठ लाख 30 हजार हुन अधिक किमतीचे खाद्यपदार्थ जप्त
- CT INDIA NEWS

- Sep 19, 2020
- 1 min read

रिपोर्टर- स्वाती व्हटकर सिटी इंडिया न्यूज
हेडिंग - अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत आठ लाख 30 हजार हून अधिक किमतीचे खाद्यपदार्थ जप्त
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत एमआयडीसी कुपवाड येथील मे आनंद इंडस्ट्रीज, दाळ न्ड बेसन मिल, या ठिकाणी छापा मारुन करवाई करण्यात आली. या ठिकाणी 7 लाख 17 हजार 500 रूपये किंमतीचे भेसळीचे चणा बेसन 10.7 टन तसेच 55 हजार 125 रुपये किंमतीचे भेसळीसाठी वापरले जाणारे मक्याचे पीठ व खाण्याचा सोडा 225 किलो, तसेच चुकीच्या पध्दतीने पॅकिंग केलेला 61 हजार 256 रुपये किंमतीचा हरबरा डाळ तुकडा 988 किलो, असा एकूण 8 लाख 33 हजार 881 रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ.
चौगुले यांनी दिली.
शुध्द चना बेसन मध्ये मक्याचे पीठ व खाण्याचा सोडा यांची भेसळ करुन पारस ब्रॅड व ज्योती ब्रॅड या नावाने पॅकिंग करुन उत्पादन करुन विक्री करण्याचे काम चालू होते. सदरचा माल ऑर्डरप्रमाणे तयार करुन बाहेरगावी पाठविण्यात येणार असल्याचे समजले व हा साठा बाहेर जाण्यापूर्वीच कारखान्यात जप्त करण्यात आला. या प्रकरणी तपासणीसाठी जप्त करण्यात साठ्यामधून चणाबेसन, अपमिश्रक (मका पीठ, खाण्याचा सोडा) व चणाडाळ यांचे नमुने घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तपासणीच्यावेळी सदर कारखान्याकडील अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंतर्गत परवान्याची मुदत संपल्याचे आढळून आले. सदर कारखान्यामध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणावर दिसून आली असून सदर कारखान्यास व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहितीही श्री.चौगुले यांनी दिली.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन सांगली सु. आ.चौगुले







Comments