top of page

अबब ! औरंगाबाद मध्ये एकाच दिवशी तीस पॉझिटिव्ह...

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Apr 27, 2020
  • 1 min read

वार्ताहार -गणेश चौधरी औरंगाबाद- शहरात दररोज रुग्ण वाढत असताना आज शहरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. कारण आज एकाच दिव

ree

शी 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनालाही मोठा हादरा बसला आहे. मागील आठवड्यापासून दररोज कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काल चार रुग्ण आढळून आल्यांनंतर आज पुन्हा तीस रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली. शहरातील भीमनगर, भावसिंगपुरा व नूरकाॅलनीतील तीन जणांचा अहवाल चार वाजता पॉझिटिव्ह आला होता. तर आता आणखी 27 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा व प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. एकीकडे कोरोना बाधीत रुग्ण बरे होत असताना दुसरीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, शहरात एकूण 83 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. असेही डॉ. कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

Comments


bottom of page