top of page

अबब...लासुर स्टेशनला आढळून आले तब्बल 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 8, 2020
  • 1 min read

ree

प्रतिनिधी- मनिष मुथा लासुर स्टेशन...


अब्बब....लासुर स्टेशनला आढळले एकाच दिवसात 10 कोरोनो पॉझिटिव्ह रुग्ण......


तालुक्यातील लासुर स्टेशन येथील सराफ गल्लीतील एक किराणा व्यापारी सकाळी कोरोनो बाधित आढळला त्यामुळे त्यांच्या संपर्कात असणाऱ्या एकूण 27 जणांचे स्वब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बी.ए.चाटे,कृष्णा औटे यांच्यासह निलेश शेळके,शरद जाधव,दादा श्रीखंडे,संजय साळवे,पंकज कुलकर्णी,सुरेश कुलकर्णी या वैद्यकीय टीमने घेतले होते त्यात एकूण नऊ जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे लासुर स्टेशन शहरात एकूण दहा कोरोनॉबाधित रुग्ण एकाच दिवसात आढळल्याने लासुर स्टेशन शहरासह पंचक्रोशीतील गावात घबराट पसरली आहे.

दरम्यान कोरोनो बाधित किराणा दुकानदार ज्या ठिकाणी किराणा व्यवसाय करत होते त्या सराफ गल्लीतील सर्व दुकाने बंद करून सोनार गल्ली सील करण्यात येऊन सरपंच,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सद्यस्य व पोलीस पाटील विनोद त्रिभुवन,शिवसैनिक,राजकीय पदाधिकारी यांनी धाव घेऊन सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली व गावकर्यानी घाबरून जाऊ नये असे आवाहन लासुर स्टेशन ग्रामपंचयत व शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments


bottom of page