अल्पसंख्याक लोकांची स्मशानभूमी गेली चोरीला
- CT India News
- Jan 30, 2021
- 3 min read
अल्पसंख्याक लोकांची स्मशानभूमी गेली चोरीला
आपला देश शेतीप्रधान देश आहे थोर विचारवंत साधू संत विविध क्रांतिकारी महिला व क्रांतिकारी नेते समाजसेवक विविध नद्या सरोवरे तलाव असे अनेक पिके तयार होणारी भूमी विविध तंत्रज्ञान शास्त्रज्ञ. आपल्याच देशात आहेत
विविध जाती जमाती समाज. सनवार. पेहराव भाषा विचार आचार खान पान. व्यवसाय. लग्न चालीरीती संस्कृती परंपरा. आणि समुहाने राहणे हे महत्वाचे गुण लोकांच्या मनात आहेत
उच्च जाती मधयम कनिष्ठ जाती हा या धर्माचा तो त्या धर्माचा बोलीवरुन आपण समोरच्या व्यक्तीची जात ओळखतो आणि आपण या जातींचे का ? असा प्रश्न करतो म्हणजे जात आपल्या मनात खोलवर घर करून बसली आहे यातच भटकंती करुन जगणारी विशिष्ट जमात. जंगलात वास्तव्य करणारे आदिवासी. नेतृत्व करण्यासाठी विशिष्ट जमात धर्म ज्ञान सांगणारे वेगळे. शेती करणारे. शत्रिय वेगळे अशी वर्गवारी करण्यात आली आहे
मुस्लिम. शिख. ईसाई. ज्यु पारशी. आणि बौद्ध. केंद्र शासन क्र डि (डि एन ) १२२७/८८/ दि ४/६/१९९० अन्वये भारतीय संविधानात अनुसूचित जाती जमाती यादीत बौद्ध धर्माचा सुध्दा समावेश करण्यात आला आहे
रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले अंबेशेत नावाचं एक छोटंसं गाव कमीत कमी १०० ते १५० वर्षांपूर्वी वसलेले आहे बौद्ध बांधव येथे रहिवासी आहेत त्यांना शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी स्मशानभूमीसाठी जागा देण्यात आली आहे आजवर या बौद्ध बांधवांच्या अंत्यविधीसाठी हि सदर जागा वापरात होती पण काही समाजकंटक लोकांनी या जागेतील लाखो रुपये किंमतीचा मुरुम उत्खनन करुन विकला आहे ग्रामपंचायत डोळे मिटून बघत बसली आहे आणि रस्त्याचे कारणं दाखवून या अल्पसंख्याक बौद्ध बांधवावर अन्याय केला जातो आहे याचा अर्थ असा होतो की माणसाला राहायला जागा मिळणे कठीण झाले आहे तसेच माणसांच्या अंत्यविधी हा अधिकार संविधान व मध्ये नोंदविला आहे
असा अन्याय बौद्ध बांधवांच्या ध्यानात आला मग त्यांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली व दमदाटी धमकी असा सुध्दा त्रास या बौद्ध बांधवांना देण्यात आला मग नाईलाजास्तव त्यांनी सुरवातीला ग्रामपंचायत नाचणे येथे पत्र व्यवहार केला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी रत्नागिरी जिल्हा अधिकारी रत्नागिरी यांना सुध्दा पत्र व्यवहार केला आहे कोणताही प्रतिसाद मिळाला नाही मिळाला प्रतिसाद तो समाधानकारक नाही वरिल पत्र व्यवहार दि २९ जून २०२० रोजी करण्यात आला आहे सर्व सामान्य बौद्ध बांधवांनी त्यांना वाढिव काही मागितले नाही आमचे आहे ते सुख सोयी उपलब्ध करून मोजणी करून जसे सातबारा उतारा यावर आहे तसे आमच्या ताब्यात मिळावे आणि त्या स्मशानभूमीत वृक्ष लागवड करण्यात यावी पकके रस्ते दिवा बत्ती यांची सोय करण्यात यावी
समाजकंटक व ग्रामपंचायत यांच्या असमाधानकारक अशा व्यवहारात आमच्या स्मशानभूमीत असणार्या धार्मिक स्थळे आमच्या स्वकीय लोकांचे चबुतरे यांनी केवळ आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी उध्वस्त केले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी कारण आज अशा लोकांना कोणतिही कारवाई न करता सोडले तर हे लोक एक वेळी आपल्या स्वार्थापोटी आपली घरे सुध्दा काढून घेऊन आपल्याला रस्त्यावर आणतील यात तिळमात्र शंका नाही
म्हणून मी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे वतीने सर्व धर्म जाती जमाती यांना आव्हान करतो की आपणास ग्रामपंचायत. नगरपालिका. बक्षिस पत्र. ट्रस्ट. देवस्थानाच्या माध्यमातून. आपल्या समाजाला दहन व दफन भूमी देण्यात आली असेल तर ती आत्ता कागदोपत्री कोणाच्या ताब्यात आहे याची चौकशी आजच करा नाहीतर उद्या पुरायचे आणि जाळायचे मोठे कोडे तयार होणार कारण आपण कोणाचे निधन झालेतरच स्मशानभूमीत जातो पण आपण त्या जागेचा शेतसारा सातबारा उतारा कधीच बघत नाही त्यावेळी त्या जागेवर अनेक टोळबहिरयाचा डोळा असतो आपणास माहीत सुध्दा नसते
आज एक बौद्ध समाज बांधव आपल्या हक्काच्या स्मशानभूमी साठी विविध माध्यमातून विविध शासकीय अधिकारी यांचे दरवाजे ठोठावत आहेत पण अजून त्यांना न्याय मिळाला नाही असा काही एकच समाज नाही कीतीतरी समाज आज आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत सातारा जिल्ह्यात कराड तालुका खळेगुडे हे गाव मुस्लिम कुटुंब पाच ते दहा त्यांना सुध्दा दफन भूमी नाही आहे ती कोणाच्या तरी मालकीची आहे गावापासून कमीत कमी पाच किलोमीटर अंतरावर आहे उद्या त्या मालकाने दफन करण्यास नकार दिला तर मग काय कोठे करणार दफन ? मोठा प्रश्न आहे
रत्नागिरी मधील अंबेशेत गाव मु पो कारले येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संसथापित बौद्ध जन पंचायत समिती शाखा क्र ४ आंबेशेत यांनी विविध ठिकाणी पत्र व्यवहार केला आहे विविध नेत्यांना सुध्दा सागडे घातले पण काही उपयोग झाला नाही कारण मतदानावेळी वेळ काढून भेटायला येणार्या कडे आज वेळ नाही
वरील प्रमाणे आपल्या हक्क व अधिकार यासाठी बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज प्रचार व प्रसार वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
९८९०८२५८५९
माहिती अधिकार
दाखल प्रकरण. (१) जन आरोग्य अभियान मार्फत जनतेचा आरोग्य जाहीरनामा मागणी अर्ज
जिल्हा रुग्णालय प्रत्त्येक जिल्ह्याच्या ठिकाणी
रेशन कार्ड
दिवयांग. ( अपंग ) लोकांच्या साठी शासन निर्णय येऊन सुध्दा निर्णय असा अपंग व्यक्तींना लवकरात लवकर नवीन शिधापत्रिका वितरण करण्यात यावी वितरण करताना प्रधान लाभार्थी कुटुंब शिधापत्रिका देण्यात यावी पण नाहक कारणे सांगून त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत









Comments