top of page

*अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्यांवर कारवाई व्हावी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तहसीलदारांना न

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 24, 2022
  • 1 min read

*अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्यांवर कारवाई व्हावी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तहसीलदारांना निवेदन*


चाळीसगांव(प्रतिनिधी)-आज दि 24 मार्च गुरुवार रोजी तालुक्यातील मेहुनबारे जवळील गिरणा नदीपात्रातून अवैध रित्या वाळू उपसा करत वाहतूक केली जात असून त्वरित अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्यांवर कारवाई करत त्वरित अवैध वाळू उपसा व वाहतूक थांबवावी असे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने देण्यात आले.

मेहुनबारे गिरणा नदी पात्रातून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून रात्रीच्या वेळेस नदी पात्रातून सर्रासपणे वाळू उपसा करत ट्रॅक्टर ट्रॉली द्वारे वाहतूक सुरू आहे, रात्रीच्या वेळेस होणारी अवैध वाळू वाहतूक ही मेहुनबारे ते चाळीसगांव शहरात होत असून याकडे दुर्लक्ष होत आहे का?असा प्रश्न निर्माण होतो एकीकडे जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष दादा पाटील यांनी गिरणा पुनर्जीवन साठी संपूर्ण जिल्ह्यात गिरणा परिक्रमा हा उपक्रम राबिवला मात्र असाच वाळू उपसा सुरू राहीला तर गिरणा पुनर्जीवन होणार का? तरी आपण या अवैध वाळू उपश्याकडे तातडीने लक्ष देत अवैध वाळू उपसा करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी व होणारा अवैध वाळू उपसा व वाहतूक त्वरित थांबवावी असे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले निवेदनावर माहिती अधिकार कार्यकर्ता महसंघाचे चाळीसगांव तालुका अध्यक्ष गफ्फार नजीर शेख,महेंद्र तुकाराम सूर्यवंशी, अनिस शेख शकुर,रोहित विलास शिंदे व सागर चव्हाण आदींच्या सह्या आहेत.

Commentaires


bottom of page