अश्विन खैरनार यांची इंटरनॅशनल युथ कॉउन्सिल,न्यू यॉर्कच्या सदस्य पदी नियुक्ती. ------ सर्वत्र अभिनंद
- CT India News
- May 4, 2021
- 1 min read
अश्विन खैरनार यांची इंटरनॅशनल युथ कॉउन्सिल,न्यू यॉर्कच्या सदस्य पदी नियुक्ती.
------
सर्वत्र अभिनंदन
------
चाळीसगांव -- क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशनचे नॅशनल चीफ इन्वेस्टिंगशन ऑफिसर तथा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर युवा रंगकर्मी अश्विन खैरनार यांची इंटरनॅशनल युथ कॉउन्सिल , न्यू यॉर्कच्या सदस्य पदी नुकतीच निवड करण्यात आली.
इंटरनॅशनल युथ कॉउन्सिल ही संयुक्त राष्ट्र (united nations) यांच्याशी संलग्न असलेली जागतिक पातळीवरील परिषद आहे.इंटरनॅशनल युथ कॉउन्सिल ची स्थापना UN Youth Assembly 2007 मध्ये झाली.इंटरनॅशनल युथ कॉउन्सिल याचे मुख्य कार्यालय हे न्यू यॉर्क येथे आहे. इंटरनॅशनल युथ कॉउन्सिलने आपल्या संपूर्ण भारतातून आतापर्यंत एकूण 104 सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या वर्षात २०२१ मध्ये भारतातील नव्या 14 सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यात श्री.अश्विन खैरनार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.









Comments