आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत काटीतील हर्षवर्धन भोसलेची रौप्य पदकाची कमाई
- CT INDIA NEWS
- Oct 29, 2019
- 1 min read

वार्ताहर अर्चना मेघेवार सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय पिंच्याक सिलाट जुनियर चँपियन्सशिप - 2019 क्रीडा स्पर्धेत जागतिक स्तरावर काटीतील हर्षवर्धन भोसले या सुपुत्राने रौप्य पदकाची कमाई केली. दि. 25 ते 27 ऑक्टोबर 2019 या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सिंगापूर, भारत, थायलंड, चायना, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, अमेरिका, इ. देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत भारताच्या वतीने 29 खेळाडूंनी प्रतिनिधित्व करत एकूण 22 पदकांची कमाई केली त्यापैकी महाराष्ट्र खेळाडूंनी बाजी मारत एकूण 10 पैकी 8 मेडल मिळवून आपले नाव जागतिक पातळीवर गाजविले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना काटी गावचे सुपुत्र हर्षवर्धन अनंत भोसले या खेळाडूने फाईट इव्हेंट या क्रीडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. सिंगापूर येथील या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी बारामती विभागातून हर्षवर्धन भोसले, सुमेध सरोदे, चैत्राली मुळीक व अमृत मलगुंडे या खेळाडूंची निवड झाली होती या पैकी हर्षवर्धन भोसले आणि सुमेध सरोदे या खेळाडूंना रौप्य पदकासह यश संपादन करता आले. खेळाडूंना या स्पर्धेतील यशासाठी भारताच्या वतीने साहेबराव ओहोळ, इलिया थॉमस , इरफान बुत्तो या गुणी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी बारामती येथील योद्धा ग्रुपचे साहेबराव ओहोळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
Kommentare