top of page

*आकोटात काटेरी झुडपात बेवारस बालक आढळले* CT india news प्रतिनिधी - नरेश पुनकर सावरा - त्या नवजात

  • Writer: CT India News
    CT India News
  • Feb 2, 2022
  • 1 min read

*आकोटात काटेरी झुडपात बेवारस बालक आढळले*


CT india news प्रतिनिधी - नरेश पुनकर सावरा -


त्या नवजात बालकाची नाळही तुटली नाही अन चक्क आईच्या कुशीत ऐवजी बेवारस स्थितीत आढळून आल्याची घटना विजय नगर आकोटात उघडकीस आली परिसरातील नागरिकांच्या माहितीवरून त्या बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले .

अकोट आकोला मार्गावरील एका वसाहतीच्या मागील विजय नगर जवळ काटेरी झुडपात एका व्यक्तीस उघड्यावर रडत असल्याचा आवाज आला त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांची माहिती पोलिसांना दीली आईच्या प्रसूतीनंतर बालकाची नाळही असल्याचे दिसून येते अशा अवस्थेतील बालकाला कुणीतरी या ठिकाणी आणून टाकले असावे. हे बालक पुरुष जातीचे असून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहे या घटनेत कलम 370 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये सुरू होती सदर निंदनीय व आई-वडिलांच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेचा कृत्य करणारयाचा शोध पोलीस घेत आहेत

Comments


bottom of page