top of page

आजादी च्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पवनार येथील (बीड नामक) पांदन रस्ताचे विभागीय आयुक्तां नागपूर

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 4, 2022
  • 2 min read

आजादी च्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पवनार येथील (बीड नामक) पांदन रस्ताचे विभागीय आयुक्तां नागपूर सौ.प्राजक्ता लवंगरे (वर्मा) यांच्या हस्ते भूमिपूजन.

पांधण व शिवपादन रस्ते दुरुस्ती झाल्याने कृषी क्षेत्राला मिळणार गती.

वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार.

***†********************

नजीकच्या पवनार येथील पवनार ते कुटकी या दोन गावांना जोडणाऱ्या (बीड नामक) पांधन रस्ताचे खस्ताहाल झाले असल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत होता. जिल्ह्याचे पालकमंत्री मा.सुनील केदार यांनाही वारंवार निवेदन देण्यात आले होते.

कुठलाही पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी लोकसह भागातून वर्गणी जमा करून मातीकाम चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी नागपूर विभागीय आयुक्त सौ.प्राजक्ता लवंगारे(वर्मा) यांच्या शुभहस्ते पवनार येथील बीड नामक पांधन रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मां.जिल्हाधिकारी वर्धा प्रेरणा देशभ्रतार यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच कृषी क्षेत्राला गती मिळावी या साठी महाराजस्व अभियाना अंतर्गत पांधन रस्ते मोकळे करून खडीकरण करण्यात यावे असे आदेश उप विभागीय अधिकारी सुरेश बगळे यांना देण्यात आले.पवनार येथील युवा प्रगतशील शेतकरी सूरज संजयराव वैद्य, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव हिवरे माजी उपसरपंच जगदीश वाघमारे,गणेश हिवरे, किशोर गोमासे, यांनी अथक प्रयत्न करून उप विभागीय अधिकारी सुरेश बगळे यांना वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असल्याने उप विभागीय अधिकारी सुरेश बगळे तसेच वर्धा चे तहसिलदार रमेश कोळपे यांनी पुढाकार घेऊन पवनार ते केदोबा पाधन रस्ता पूर्णत्वास नेला.

याचं पार्श्भूमीवर पवनार ते बीड या पांधन रस्त्याचे हि भूमिपूजन करून माती कामाचा शुभारंभ करण्यात आला तसेच पादन रस्ते खडीकरण झाल्यास शेती वहीवाटीस व कृषी क्षेत्राला गती मिळून उत्पादन क्षेत्रात हि मोठी वाढ होणार असल्याने शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले शेतकऱ्यांकडून नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांचे प्रगतशील युवा शेतकरी सुरज वैद्य यांनी सुत माला देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे पवनार गावच्या सरपंच शालिनी आदमने यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. या वेळी प्रामुख्याने उपस्थित मंडळ अधिकारी शैलेंद्र देशमुख पवनार तलाठी संजय भोयर. पवनार ग्रा.प. चे ग्रामविकास अधिकारी ऐ.बी.ढमाळे, मुरलीधर वैद्य, दिलीपराव वैद्य,अनिल आंबटकर, शुभम खंते, राजू हिवरे, सुरेश हिवरे,दामोदर हिवरे, राजेंद्र गोमासे, देविदास येरुणकर, अशोक बांगडे, प्रकाश चोंदे, संजय वैद्य, शामराव भट व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments


bottom of page