आपल्या जिल्ह्यातील शिक्षक संवर्ग हा अति अत्यावश्यक सेवेत येत नाही .शिक्षकांचे मुख्य कार्य विद्यार्थ्
- CT India News
- Feb 11, 2022
- 1 min read
आपल्या जिल्ह्यातील शिक्षक संवर्ग हा अति अत्यावश्यक सेवेत येत नाही .शिक्षकांचे मुख्य कार्य विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊन सर्वांगीन विकास करणे हे आहे.त्यामुळे शिक्षकांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतिने जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांना निवेदन दिले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक आठ डिसेंबर 2021 रोजी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे असा आदेश दिल्या मुळे प्रशासकीय यंत्रणा शिक्षक मुख्यालयी राहतात किंवा नाही याची माहिती पुराव्यासह संकलन करत असल्याने शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले .शिक्षक बंधू भगिनी मानसिक तणावात आहे खरं तर शिक्षक आनंदी व निर्भय वातावरणात असतील तर उत्कृष्टपणे आपलं कार्य करू शकतील..त्यामुळे मा.जि.प.अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिक्षण सभापती यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या वतिने विनंती करून शिक्षकांना मुख्यालयी रहाणे सक्तीचे करू नये असे निवेदनात म्हटले आहे..
निवेदनावर शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल जाधव जिल्हा उपाध्यक्ष विलास वाघ पं.स.सदस्य बद्रीनाथ चव्हाण गंगापूर तालुकाध्यक्ष जे.के.राऊत केंद्र प्रमुख शिवाजी ढाकणे संतोष आळंजकर शिक्षक भारतीचे सरचिटणीस अरूण अल्हाड यांच्या स्वाक्ष-या आहेत.









Comments