top of page

आम आदमी पक्ष्याची मागणी

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Nov 18, 2019
  • 2 min read

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊन सरकारी गायरान व इतर प्रकारच्या जमिनीत व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आम आदमी पक्षाची मांगणी ===================== संदीप इंगळे :- अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती पीक बाधित होऊ अतोनात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनस्तरावर पंचनामे चालू आहे परंतु सिल्लोड तालुक्यामध्ये असंख्य असे शेतकरी आहेत की जे शेतजमिनी मध्ये वंशपरंपरागत शेतजमिनीची कास्त कुटुंबाची उपजीविका भागवित आलेले आहे. परंतु तांत्रिक कारणाने अशा शेतकऱ्यांची नावे 7/12 चे मालकी रकान्यात नाही परंतू कित्येक वर्षापासून कूळ आधारे, कब्जा आधारे, सरकारी गायरान जमीन यामध्ये असंख्य शेतकरी कास्त करीत आहे. परंतु 2015 च्या शासन निर्देशाप्रमाणे केवळ 7/12 उताऱ्यावर मालकी रकान्यात नाव असलेल्या व्यक्तींनाच लाभ मिळत असल्याने अशा शेतकर्‍यांची घोर फसवणूक होऊन त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. अशा शेतकऱ्यांना यापूर्वी शासनाचे दुष्काळ निधी, लाल्या रोग वगैरे नुकसान भरपाई 2012 पर्यंत मिळत होती. परंतु 2012 पासून शासनाकडून संगणीकृत 7/12 चे कारण पुढे करून सदर शेतकऱ्यास मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली. एवढेच नव्हे तर सदर शेतकऱ्यांचे निरंतर वहीती असतांनाही 2015 नंतर संगणीकृत सातबारा मध्ये वहीती रकाना नाही, असे कारण दर्शवून संगणकीकृत 7/12 वरून त्यांची नावे तांत्रिक कारणाने कमी करण्यात आली. त्यामुळे सदर शेतकऱ्यावर अन्याय झाला असून केवळ अभीलेखी संगणीकृत सातबारा उताऱ्यात मालकी रकान्यात नाव नाही म्हणून शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम नाकारली जात असून तालुक्यांमध्ये असंख्य शेतकऱ्यांच्या समस्या आहेत की सातबारा उतारा मध्ये वेगळी नावे आहेत आणि प्रत्यक्षात कास्तकाराची नावे वेगळी आहेत, ज्यामध्ये सरकारी गायरान जमिनी, कुळाच्या जमिनी व इतर कास्तकाराच्या जमिनी अशा जमिनीचा समावेश होतो शासनाकडून 2015 च्या परिपत्रकात प्रमाणे आम्ही मालकाला नुकसान भरपाईची करिता महसूल स्तरावर स्वतंत्र पंचनामे करण्यात येत आहे परंतु वहिती दाराला नुकसानभरपाई देण्याकरता शासनाने आम्हाला निर्देश दिले नाही म्हणून सदर प्रकरणांमध्ये संपुर्ण नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची ज्या शेतकऱ्यांची सरकारी गायरान प्रकारातील जमीन किंवा मालकाव्यतिरिक्त इतर जमिनीत कास्त करीत असलेल्या अभिलेख के 7 ब प्रमाणे नोंद असलेल्या शेतकऱ्यांचे स्वतंत्र पंचनामे करून नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी या मागणीसाठी आम आदमी पार्टी सिल्लोड यांनी महामहीम राष्ट्रपती साहेब, राज्यपाल साहेब, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मुंबई यांच्यासह महसूल अधिकाऱ्याकडे केली असून सदर निवेदनावर आम आदमी पक्षाचे अजबरावजी मानकर, डॉक्टर दत्तात्रय गोंगे, अॅडवोकेट शेख उस्मान ताहेर, महेश शंकरपल्ली, शेख मुख्तार अब्दुल सत्तार, नजीर तडवी, मुक्तार शहा मुसा शहा, सुनील गुळवे, मिलिंद जाधव, फकीरा दौंड, प्रकाश पालोदे, कृष्णा तोताराम पालोदे आदींच्या स्वाक्षऱ्या असून अगामी काळात शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई न दिल्यास आम आदमी पक्षातर्फे त्रीव स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे आम आदमी पक्षाचे सिल्लोड शहर संयोजक ॲड. शेख उस्मान शेख ताहेर यांनी सांगितले आहे.

Commenti


bottom of page