top of page

आम्ही जीव धोक्यात टाकून' "अग्गबाई सासूबाई "च्या शुटिंगला बाहेर पडतो.अशे म्हणणारे गिरीश ओक झाले ट्रोल

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jul 27, 2020
  • 1 min read


प्रतिनिधी-सागर खंडागळे-औरंगाबाद-करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम मालिकांच्या शूटिंगवरही झाला. मार्च महिन्यापासून सर्वच मराठी, हिंदी मालिकांबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील सर्व काम जवळजवळ बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून अनेक मालिकांचे शूटिंग सुरु झालं असून विशेष काळजी घेत मालिका चित्रित करण्यात येत आहे. अल्पावधीमध्येच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेची शुटींग जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरु झालं.  जवळपास तीन महिन्यांनंतर शूटिंगला सुरुवात झाल्याने छोट्या पडद्यावरील कलाकारांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ या लोकप्रिय मालिकेच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली असून बबड्या उर्फ आशुतोष पत्कीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला होता. मात्र असं असलं तरी या मालिकेच्या कथानकावरुन अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट आणि खास करुन बबड्या आणि त्याची सोशल नेटवर्किंगवर ट्रोलिंग केलं जातं. अशाच एका पोस्टवर मालिकेतील प्रमुख कलाकारांपैकी एक असणाऱ्या गिरीश ओक यांनी, “आम्ही जीव धोक्यात टाकून शुटींगला येतो,” अशी कमेंट केली आणि त्यावरुनही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलं केलं आहे.


झालं असं की निशा सोनटक्के यांनी फेसबुकवर ‘अग्गंबाई सासूबाई’च्या कथानकावर उपहासात्मक टीका करणारी एक पोस्ट लिहिली. नजर काढताना वापरल्या जाणाऱ्या मिर्च्या आणि मीठ असणाऱ्या हातांचा फोटो पोस्ट करत, “आसावरी दृष्ट काढ तुझ्या बाळाची देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करतोय. तुझी पण मी दृष्ट काढते अरे काय लिहितात रे. शी रे नाही बघवत,” असं म्हटलं होतं.

'

Comments


bottom of page