top of page

. आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत भाळवणी कोविड सेंटरमध्ये दोन जोडप्यांचा पार पडला विवाह सोहळा...

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jun 9, 2021
  • 3 min read

*CT INDIA NEWS लासूर स्टेशन प्रतिनिधी मनीष मुथा. .

आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत भाळवणी कोविड सेंटरमध्ये दोन जोडप्यांचा पार पडला विवाह सोहळा...


कोरोना रुग्णांचा आशीर्वाद घेत दोन जोडपे नवदांपत्य कोवीड सेंटर मध्ये झाले विवाहबद्ध



गंगापुर: पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर भाळवणी हे सध्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात विदेशातही चर्चेचा विषय ठरले आहे. इतिहास जमा होणाऱ्या अनेक घटना गेल्या दोन महिन्यापासून या कोवीड सेंटरमध्ये पहावयास मिळत आहे.

पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे सुरु केलेल्या कोविड सेंटरमध्ये आमदार लंके पूर्णवेळ रुग्णसेवा करत असतात त्यांच्या या सामाजिक कार्यावर प्रेरित होऊन शासनाने ठरवून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करत सोमवारी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर भाळवणी येथे दोन उच्चशिक्षित जोडप्यांचा विवाह सोहळा आमदार निलेश लंके व शेकडो कोरोना रुग्णांच्या उपस्थितीत पार पडला .

कोरोना रुग्ण हे आपले बांधव नातेवाईकच आहेत. परंतु या आजारामुळे समाजात त्यांच्याकडे तिरस्काराने पाहिले जाते.

आमदार लंके या रुग्णांना आपले कुटुंब समजून पूर्णवेळ त्यांची सेवा करतात आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून कोरोना रुग्णांबद्दलची समाजात असणारी भीती कमी करण्यासाठी मूळचे पारनेरचे रहिवासी असणारे व नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ठाणे शहरात वास्तव्यास असणारे सखाराम बाप्पु व्यवहारे यांचे चिरंजीव निकेत सखाराम व्यवहारे व अहमदनगर येथील कन्या चि.सौ.का. आरती नानाभाऊ शिंदे तसेच रावसाहेब शंकर काळे वांजोळी तालुका नगर यांची कन्या चि.सौ.का. राजश्री व जनार्दन पुंजाजी कदम खानेगाव तालुका नेवासा येथील उच्चशिक्षित तरुणांनी आपल्या नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यासाठी मा. शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर भाळवणी येथे आमदार लोकनेते निलेशजी लंके यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी व रुग्ण बांधवांचा शुभेच्छा रुपी आशीर्वाद घेण्यासाठी भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिरात विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला व शेकडो कोरोना रुग्ण आमदार लंके व प्रतिष्ठान व राष्ट्रवादीच्या सहकारी मित्रांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या ठराविक नातेवाईकांसह उपस्थित राहून कोबिर सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला .

विवाह म्हटला तर खर्च हा येतोच या अवांतर खर्चाला आळा घालून ती रक्कम कोरणा रुग्णांच्या कामी यावी ही या सामाजिक जाणिवेतून या दोन्ही नव वधू-वरांनी संपूर्ण रुग्णांसाठी मास्क, सॅनिटायझर,पि. पि.कीट, अत्यावश्यक औषधे या सह लग्नाला येणारा खर्चात या सेंटरला अल्पशी आर्थिक मदत देत सर्व कोरणा रुग्णांना आपले नातेवाईक हितचिंतक वऱ्हाडी आहे असे समजून सुरुची भोजनही दिले पारंपारिक विवाह पद्धतीप्रमाणे ब्राम्हण अंतरपाठ धरणारे सनई चौघडे सुर रुखवत ठेवण्याच्या जागेवर सॅनिटायझर मास्क मेडिसिन लावण्यात आले होते व संपूर्ण रुग्णांना एखाद्या राजेशाही लग्न प्रमाणे सुरुची भोजन ही देण्यात आले हे या सेंटरमध्ये झालेल्या विवाहाचे वेगळेपण म्हणावे लागेल .

महाराष्ट्रात घडलेल्या या अनोख्या विवाह बंधनात अडकणाऱ्या या नवदाम्पत्यांनी ऐतिहासिक निर्णय घेत शासनाच्या सर्व अटी व नियमांचे पालन करत कोरोना तपासणी करून घेत एक अनोखे शुभ मंगल कार्य आमदार लंके व इतर मान्यवरांच्या सह कोरोणा रुग्णाच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले व त्यांचा आशीर्वाद घेत नवीन वैवाहिक जीवनास या नव दाम्पत्याने सुरुवात केली .

या वेळी श्री.राहुल झावरे, बाबाजी तरटे बाळासाहेब खिलारी,राजेंद्र चौधरी,आशोक घूले,श्रीकांत चौरे, डॉ.सुनिल गंधे,बंडू कुलकर्णी,दत्ता कोरडे, प्रमोद गोडसे, संदीप भागवत, संदीप चौधरी, सत्येम निमसे, देवराम व्यवहारे, सुदाम शिंदे, रामभाऊ रासकर, लहू व्यवहारे, रावसाहेब काळे, आदिनाथ काळे, जगदीश काळे लहू व्यवहारे,रमेश व्यवहारे,दोन्ही वधू-वरांचे मामा उपस्थित नातेवाईक यांचे सह निलेश लंके प्रतिष्ठान,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक सहकारी मित्र पदाधिकारी हितचिंतक व शेकडो कोरोणा रुग्ण यावेळी उपस्थित होते.


*चौकट :*

चि.निकेत व्यवहारे व चि.सौ.का.आरती तसेच चि.राहुल व चि.सौ.का.राजश्री या उच्चशिक्षित तरुणांनी रुग्णांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींना विचारून व शासनाच्या अटी व नियमांचे पालन करत कोविड सेंटरमध्ये रुग्णांचा आशीर्वाद घेत आरोग्य मंदिरात विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला त्यांनी उचललेले पाऊल हे खरोखरच ऐतिहासिक म्हणावे लागेल.अचानक पणे अनापेक्षित माझ्या सहकाऱ्यांना त्यांचा फोन आला व आम्हाला माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिरात येऊन रुग्णांचा आशीर्वाद घेऊन तेथेच विवाह समारंभ पार पाडून आमच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करायची असा हट्ट धरला. आम्ही शासनाच्या नियमा प्रमाणे सर्व अटी व शर्तींचे पालन केले आहे.असे सांगत अचानक या दोन्ही नवविवाहित जोडप्यांनी या सेंटर मध्ये प्रवेश केला.व कोवीड सेंटर सह संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्काच दिला.दोन दिवसापूर्वी जागतिक पर्यावरण दिन होता त्याचे औचित्य साधत मी दोन्ही वधूवरांना एक वृक्ष दान केले व या वृक्षाची जोपासना आम्ही नक्कीच करणार असा सामाजिक भावनेतून काम करत असणारे व समाजासाठी ही प्रेरक ठरणारे या धाडसी दोन्ही नवदांपत्यांचे मी कौतुक करतो व त्यांच्या भावी जीवनासाठी सुयश चिंतितो !

आ.निलेश लंके

Comments


bottom of page