top of page

आमदार मंगेश चव्हाण यांच्या आमदार निधीतून विश्व

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jan 10, 2022
  • 2 min read

चाळीसगाव ता. प्रतिनिधी : विकी पानकर मो. 8605074861


आमदार मंगेश चव्हाण यांच्या आमदार निधीतून विश्व रुहानी केंद्र येथील पेव्हर ब्लॉक विकासकामांचे लोकार्पण,


दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल भाविकांनी मानले आमदारांचे आभार...



चाळीसगांव - येथील विश्व मानव रुहाणी केंद्र येथे ४ महिन्यांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी केंद्रातील भाविकांच्या मागणीच्या अनुषंगाने विश्व मानव रुहाणी केंद्र येथील आवारात पेंव्हर ब्लॉक च्या कामाचे भूमिपूजन केले होते, आमदार स्थानिक विकास निधीतून चारच महिन्यात सदर काम पूर्ण झाले व आज दि.९ जानेवारी रोजी विश्व मानव रुहाणी केंद्र चाळीसगाव च्या १८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सदर लोकार्पणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून व फीत कापून सदर पेव्हर ब्लॉक चे उद्घाटन करण्यात आले, सदर कार्यक्रमास उपस्थित राज्य निगारण कमिटी अध्यक्ष गणेश धनगर सर यांनी मनोगतातुन आमदारांचे आभार मानले, खरच आपण फक्त आमदार नसून समाजाचे सेवक आहात व आपण दिलेला शब्द पूर्ण केला त्या बद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत अशी भावना सर्व सत्संग भक्त परिवाराच्या वतीने व्यक्त केली,

यावेळी लीगल कमिटी प्रमुख किशोर अहिरराव, निगारण कमिटी राज्य सदस्य राजेश भोयर, कासार साहेब, बापू सोनवणे, सुनील सोनार, माजी नगराध्यक्ष डी आर दादा चौधरी, मा नगरसेवक रविंद्र चौधरी, देसले नाना, mseb उपकार्यकरी अभियंता विनोद बाविस्कर, कैलास पाटील, जितेंद्र रवींद्र पाटील, आनंद कोळी, अतुल पाटील सर, चेतन पाटील, दामू अण्णा पाटील, रमेश चौधरी, भगवान चौधरी आदी उपस्थित होते.


आमदार मंगेश चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, अध्यात्मिक व वारकरी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात वाढल्याने समाजात असणाऱ्या सर्व धार्मिक संप्रदाय याविषयी नेहमीच आपुलकी वाटत आली आहे. आपल्या निधीच्या माध्यमातून धार्मिक केंद्रांसाठी सोयीं सुविधा उपलब्ध करून देता येत असल्याने तो निधी खऱ्या अर्थाने सत्कारनी लागत असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.


प्रस्तावना करत असताना दीपक चौधरी यांनी सांगितले की, वारकरी पुत्र मंगेश दादा यांनी माझ्या आई वडिलांना पंढरपूर ला घेऊन जात विठ्ठल रुखमाई यांचे दर्शन घडवून आणले. माझी आई मला पंढरपूरहून परत आल्यानंतर म्हणाली, मंगेश दादांनी आमची पंढरपूर येथे आमच्या मुलांप्रमाणेच सेवा केली व हे ती आजही नेहमीच कौतुकाने सर्वाना सांगत असते असा अनुभव त्यांनी उपस्थितांना सांगितला.


सूत्र संचालन पाटील सर यांनी केली, प्रस्तावना दीपक चौधरी यांनी तर आभार गौरव माने यांनी मानले.

Comments


bottom of page