आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून चाळीसगाव तालुक्य
- CT India News
- Nov 22, 2021
- 2 min read

*चाळीसगाव ता. प्रतिनीधी: विकी पानकर मो 8605074861
*
आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून चाळीसगाव तालुक्यातील २४ ग्रंथालयांना स्पर्धा परीक्षांची पाच लाखांची पुस्तके उपलब्ध
ग्रंथसंपदा वितरण समारंभात मान्यवरांनी केले आमदारांच्या उपक्रमाचे कौतुक
सर्व ग्रंथालयांना फ्रेम स्वरुपात शुभेच्छापत्र भेट
चाळीसगाव तालुक्यात असंख्य विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यात एक-एक पुस्तकाचे किंमती हि त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अशात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली स्वप्ने पूर्ण करता यावी यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून व स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील २४ शासन मान्यता असलेल्या ग्रंथालयांना ५ लाखांचे स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून दिली आहे. येथील अंत्योदय जनसेवा कार्यालयात ग्रंथसंपदा वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आपल्या जीवनात पुस्तकांचे स्थान खूप महत्वाचे आहे. पुस्तके वाचलीच पाहिजे. कारण पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते. आणि ज्याचे मस्तक सुधारले. तो उभ्या आयुष्यात कोणापुढे नतमस्तक होत नाही. असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. यावेळी शेठ नारायण बंकट वाचनालयाचे अध्यक्ष प्रितमदास रावलाणी, योगाचार्य वसंतराव चंदात्रे, नगराध्यक्षा सौ.आशालताताई चव्हाण, ग्रंथमित्र अण्णा धुमाळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के.बी.दादा साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, रा.वि.कॉलेज प्राचार्य एस.आर.जाधव सर, के.आर.कोतकर कॉलेज प्राचार्य बिल्दीकर सर, प्रा.पंकज नन्नवरे सर, प्राचार्या साधना ताई निकम, भाजपा नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे, जेष्ठ पदाधिकारी रमेश सोनवणे सर, जिल्हा परिषद सदस्या सौ.मंगलाताई भाऊसाहेब जाधव, पंचायत समिती माजी सभापती दिनेशभाऊ बोरसे, पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे, महिला आघाडी शहराध्यक्ष सौ.संगीताताई गवळी, अल्पसंख्यांक महिला आघाडीच्या रीझवाना खान, नगरसेवक राजेंद्र अण्णा चौधरी, चंद्रकांत तायडे, सोमसिंग आबा राजपूत, भाजपा प्रज्ञावंत आघाडी तालुकाध्यक्ष प्रा.जगदिश सूर्यवंशी सर, शहराध्यक्ष राकेश बोरसे सर, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस अमोल नानकर, शिक्षक आघाडी शहराध्यक्ष मनोज सूर्यवंशी सर, तालुकाध्यक्ष विजय कदम सर, माजी नगरसेवक संजय घोडे सर, प्रा.गुणवंतराव शेळके, सुधिर आबा पाटील, मिलिंद देव सर, चिमणपुरे सर, वि.वि.देशपांडे सर, सामंत साहेब, भिकणराव गायकवाड, सुर्यकांत पाटील, खुशाल दत्तू अहिरे , पी.एस.करनकाळ, चंद्रकांत ठोंबरे सर, ताराचंद पाटील, प्रा.नितीनकुमार माळी, रत्नाकर पाटील, योगेश पाटील, राहुल साहेबराव बाविस्कर, नितीन पवार, भैय्या पाटील, दिपचंद नाना पाटील, दिपक नाना पवार, विश्वास पवार सर, विकास खैरे, प्रभाकर तान्हा शिंदे, भिला सोनवणे, राहुल साहेबराव बाविस्कर आदी उपस्थित होते.
ग्रंथसंपदा वितरण समारंभात मान्यवरांनी केले आमदारांच्या उपक्रमाचे कौतुक,
सर्व ग्रंथालयांना फ्रेम स्वरुपात शुभेच्छापत्र भेट
आपल्या निधीचा सुयोग्य उपयोग करत नवीन पिढीला स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारी ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिल्याबद्दल सदर ग्रंथसंपदा वितरण समारंभात मान्यवरांनी मनोगतात आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे 'ग्रंथ हेचि गुरू' हे शिर्षक असलेली व ग्रंथालय, वाचनालय यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणारी शुभेच्छापत्र फ्रेम सर्व वाचनालय यांना भेट देण्यात आली.
या २४ वाचनालयांना मिळाली पुस्तके....
शेठ नारायण बंकट वाचनालय, चाळीसगाव
कृष्णाई सार्वजनिक वाचनालय, चाळीसगाव
धनाई पुनाई सार्वजनिक वाचनालय, दरेगाव ता.चाळीसगाव
स्व.लोककवी भास्करराव साळुंखे सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय खेडगाव
कै.जयवंताबाई पाटील सार्वजनिक वाचनालय, खेडी खुर्द ता.चाळीसगाव
कै.के.की. मूस प्रतिष्ठान संचलित आशिर्वाद सार्वजनिक वाचनालय, चाळीसगाव
नानापाटील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय चिंचखेडे ता.चाळीसगाव
श्री.गुरुगणेश सार्वजनिक वाचनालय, रांजणगाव ता.चाळीसगाव
श्रीराम सार्वजनिक वाचनालय, टाकळी प्र.दे. ता.चाळीसगाव
श्री.संत शंकर महाराज सार्वजनिक वाचनालय, शिरसगाव ता.चाळीसगाव
श्री चक्रधर स्वामी ग्रामीण वाचनालय, दस्केबर्डी ता.चाळीसगाव
सानेगुरुजी वाचनालय बहाळ, ता.चाळीसगाव
सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, टाकळी प्र.चा. ता.चाळीसगाव
आण्णासाहेब मोहन गुंडाजी निकम सार्वजनिक वाचनालय, तळेगाव तांडा ता.चाळीसगाव
स्व.बालकवी ठोंबरे सार्वजनिक वाचनालय, खडकी बु. ता.चाळीसगाव
ज्ञान भूषण ग्रंथालय वाचनालय, पिलखोड ता.चाळीसगाव
शिव छत्रपती सार्वजनिक वाचनालय, भामरे बु. ता.चाळीसगाव
कै.राजसबाई नामदेवराव शिंदे सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, अलवाडी
क्रांतीज्योती सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय वाघळी, ता.चाळीसगाव
जनार्दन सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय, कळमडू ता.चाळीसगाव
जयभोले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, प्रिंप्री बु. प्र.दे. ता.चाळीसगाव
सर्वोदय सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय ब्राह्मणशेवगे ता.चाळीसगाव
सार्वजनिक वाचनालय उंबरखेड ता.चाळीसगाव
स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, करगाव ता. चाळीसगाव..







Comments