आर.पी.आय.(खरात) विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म.न.पा.उपआयुक्तना निवेदनतुन आंदोलनाचा इशारा
- CT INDIA NEWS

- Aug 15, 2019
- 1 min read

औरंगाबाद :- अमरदिप हिवराळे , प्रियदर्शनी उद्यान येथे हजारो झाडाची कत्तल करून स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यासाठी काही लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहे. औरंगाबाद शहर प्रदुषणाच्या विळख्यात असतांना हजारो झाडाची कत्तल करायची. एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असे सरकारचे धोरण असतांना पुतळा बसवण्यासाठी निधी मंजूर कसा होतो. शहरात रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता ही समस्या नागरिकांना त्रासदायक आहे. तसेच पाण्याचा प्रश्न आठवड्यातून 1 दिवस पाणी येते. महानगरपालिकाच्या बंद पडलेल्या शाळा याकडे मनपा डोळेझाक करत आहे. कच-याचा प्रश्न आहे तसाच आहेत. स्मारकासाठी आलेला निधी हा या वरील समस्या सोडवण्यासाठी व्हायला पाहीजे. जेणेकरून आपला औरंगाबाद शहर स्वच्छ सुदंर होईल व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल या संदर्भात आज दि. 13.08.2019 रोजी मनपा उप उपआयुक्त मंजुषा मुथा मॅडम यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष मनिष नरवडे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन. स्मारक बसवू नये आणि आलेला निधी शहराच्या विकासासाठी वापरावा अशी मागणी केली. यावेळी जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी आघाडी. मनिष भाई नरवडे, जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ साळवे, रवि भावले, सुरज सुर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते .







Comments