top of page

आशा सेविकांना शासकीय सेवेत कायम करा... आशा सेविकांची मागणी...

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jun 17, 2021
  • 1 min read

गंगापूर तालुका प्रतिनिधी.मनीष मुथा


आशा सेविकांना शासकीय सेवेत कायम करा... आशा सेविकांची मागणी...


सरकारी योजना व विमा कवच देण्यात यावे....



गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत येणाऱ्या व गेल्या कोरोनॉकाळात अविरत सेवा देणाऱ्या व गंगापूर तालुका कोरोनॉमुक्त करण्यासाठी तुटपुंज्या मानधनात काम करणाऱ्या आशासेविकांना कायम करा व सरकारी लाभ देऊन वेतन चालू करण्यात यावे.

दरम्यान यावेळी पूजा त्रिभुवन,सलिता चव्हाण,मंजुषा सोनवणे,किरण गायकवाड, पंचशिला बनकर,मीना नरवडे,सारिखा रणयेवले, योगिता खरात ,अनिता गायकवाड,नंदा चव्हाण,आदींसह इतर आशा सेविका यांनी निवेदन प्राथमिक आरोग्य केन्द्रचे आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब चाटे याना लेखी निवेदन देण्यात आले.

Comments


bottom of page