इंटर स्पोर्ट अँड मार्शल आर्ट अकँडमी मुंबई येथील प्रजापती हॉल कुर्ला याठिकाणी मार्शल आर्ट टुर्नामेंट
- CT INDIA NEWS

- Nov 24, 2019
- 1 min read

मुंबई प्रतिनिधी :- अर्चना मेघेवार सविस्तर असे कीं मार्शल आर्ट चे प्रशिक्षक व इंटर स्पोर्ट अकादमी चे संस्थापक तसेच भारत सरकार खेल पुरस्कार मान्यता प्राप्त मां. संदेश थिटेसर यांनी या टुर्नामेंट चे आयोजन केले होते या टुर्नामेंट मध्ये सर्व वयोगटातील विद्यार्थी यांनी यांच्या स्पर्धा घेऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल प्रदान करण्यात आले या मध्ये गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्राँझ मेडल असे तिन प्रकारे पुरस्काराचे स्वरूप होते या टुर्नामेंट कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार दिलीप मामा लांडे साहेब यांचे सुपुत्र मा. श्री. प्रणव लांडे साहेब होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेस मिडिया संघटना चे प्रदेश अध्यक्ष भाई अशोक पाटील होते तर या पुरस्काराचे वितरण प्रेस मिडिया संघटना चे राज्यातील पदाधिकारी यांच्या हस्ते हि करण्यात आले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकादमी चे सर्व प्रशिक्षक वर्ग व हितचिंतक यांनी सहकार्य केले







Comments