top of page

*इस्लामपुरात सावकारी टोळीतील मनसेच्या शहर अध्यक्षाला

  • Writer: CT India News
    CT India News
  • Dec 27, 2021
  • 2 min read

इस्लामपूर (प्रतिनिधी) : *सचिन माळी*

*हेडिंग* : *इस्लामपुरात सावकारी टोळीतील मनसेच्या शहर अध्यक्षाला अटक;  रोख १५ लाख व कागदपत्रे जप्त*


12 जणांच्या  बेकायदेशीर सावकारी टोळीतील मनसेचा इस्लामपूर शहर अध्यक्ष असणारा सचिन उर्फ सनी मारुती खराडे रा. हनुमान नगर इस्लामपूर  या खाजगी सावकाराला  पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून   रोख १५ लाख व कागदपत्रे त्याच्या घराच्या झडतीत पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याला अटक करून इस्लामपूर पोलिसांनी आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी इरलामपूर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने  दि.२९ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


गुन्हयातील तक्रारदार – बाजीराव दिनकर

पाटील रा इस्लामपूर ता वाळवा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खाजगी सावकार- सचिन ऊर्फ सनी मारुती खराडे वय ३५ वर्षे, रा- हनुमाननगर इस्लामपूर ता. वाळवा यास  पोलिसांनी अटक केली त्याचेकडून १५ लाख रुपये हस्तगत करण्यात आले असून त्यांने मुदल व व्याजाचे मोबदल्यात घेतलेले तीन चेक जमीनीचे साठेखत इसारतपत्र अशी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत


बेकायदेशीर सावकारी व्याजाने पैसे देणारे  १) बालम हनिफ जमादार रा गोळेवाडी पेठ ता वाळवा २) हिंदूराव बबन मोरे रा कापूसखेड ता वाळवा २) एक सागली येथील व्यापारी नांव पत्ता माहीत नाही. ३)सांगली येथील तीन व्यापारी नाव पत्ता माहीत नाही ४) पवार रा. वाळवा पुर्ण नाव पत्ता माहीत नाही.५) जगन्नाथ किसन चिखले रा नवेखेड ता. वाळवा ६)सुजित पाटील रा. इरलामपूर ता वाळवा ७) एक कापड

दुकानदार इस्लामपूर ( नाव पत्ता माहीत नाही ) ८) धैर्यशिल संताजीराव पाटील वय- ५६ वर्षे, रा कामेरी ता वाळवा ९) संभाजी शिवाजी पवार वय-३८ वर्षे, रा- होळकर दुध डेअरीजवळ इस्लामपूर ता वाळवा १०) ज्ञानदेव जाधव रा- सातवे ता- हातकणंगले जि कोल्हापूर वगैरे लोकांच्यावर गुन्हा दाखल होता

सदर गुन्हयामध्ये १) बालम हनिफ जमादार रा गोळेवाडी पेठ ता वाळवा २) हिंदूराव बबन मोरे रा

कापूसख्खेड ता वाळवा ३) संभाजी शिवाजी पवार वय-३८ वर्षे, रा- होळकर दुध डेअरीजवळ_इस्लामपूर ता वाळवा ४) धैर्यशिल संताजीराव पाटील वय- ५६ वर्षे, रा कामेरी ता वाळवा यांना अटक केली असून यांचेकडून घरझडती मध्ये रोख रक्कम- ०१,०८,१००/-, कोरे चेक, मोटर सायकल वगैरे कागदपत्र हस्तगत केली आहेत. त्यांची दि.२७/१२/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर आहे.

अपर पोलीस अधीक्षक दुबुले मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी  कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण हे तपास करीत  आहेत .अशा प्रकारे आणखीन कोणाची वरील आरोपींच्या विरुध्द तक्रार असलेस त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाणेस संपर्क करावा. असे आवाहन केले आहे.



संपर्क CT INDIA NEWS

*कार्यकारी संपादक*

*तुकाराम सुतार सर*

*9604007344* www.ctindiatv.com

🔷 *नम्र आवाहन*🔷

*आपणाकडे कोणत्याही शासकीय-निमशासकीय कार्यालयात चुकीच्या मार्गाने पैशाची मागणी करीत असेल किंवा त्यामुळे आपले काम थांबवत असेल तर त्वरीत लाच- लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा. किंवा विनामुल्य सहकार्य व मार्गदर्शनासाठी CT INDIA NEWS संपादक श्री गणेश चौधरी सर यांच्याशी 8329897617 या क्रमांकावर संपर्क साधा*

Comments


bottom of page