top of page

*ईपीएस-95 पेन्शन धारकाचे भविष्य निर्वाह कार्यालयावर मूक धरणे आंदोलन* ईपीएस-95 पेन्शन धारकाच्या न्या

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 9, 2022
  • 2 min read

प्रतिनिधी- गणेश चौधरी

*ईपीएस-95 पेन्शन धारकाचे भविष्य निर्वाह कार्यालयावर मूक धरणे आंदोलन*

ईपीएस-95 पेन्शन धारकाच्या न्याय मागण्या तातडीने मंजूर व्हाव्यात यासाठी बुधवार दिनांक ९ मार्च २०२२ रोजी भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर मूक धरणे आंदोलन करण्यात आले.

ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती देशातील ७० लाख पेन्शन वाढीच्या न्याय हक्कासाठी, देशातील सत्तावीस राज्यांमध्ये, गेल्या पाच वर्षापासून राष्ट्रीय अध्यक्ष मा. कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. संघटनेने विविध प्रकारचे आंदोलन केले आहेत. संबंधित मंत्री महोदय व सीबीटी सदस्य तसेच देशातील बहुसंख्य खासदार यांना भेटून, समक्ष चर्चा करून निवेदने दिली आहेत.

दिनांक ४ मार्च २०२० व ५ आँगस्ट २०२१ रोजी दोन वेळा सन्माननीय प्रधानमंत्रीजीनी संघटनेच्या शिष्टमंडळाला प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ दिला व आश्वासित केले की, पेंशनधारकना महागाई निर्देशांकानुसार, किमान पेन्शन रुपये ७५०० मंजूर करण्यासाठी सकारात्मक कार्यवाही केली जाईल. त्याप्रमाणे मा. पंतप्रधानांनी पीएम कार्यालयाचे राज्यमंत्री मा.जितेंद्र प्रसादसिंह यांना सदरचा उद्देश साध्य करण्यासाठी पेंशनधारकानाही सन्माने जिवन जगता येईल अशा निर्यणयाप्रत पोहचण्यासाठी निर्देश दिले होते.त्यामुळे मा. श्रममंत्री यांच्या आवाहनानुसार,संघटनेने देशातील सर्व आंदोलने स्थगित करुन , मुख्यालयामध्ये फक्त साखळी उपोशन सुरु ठेवले आहे.सदर साखळीउपोशनाचा

आजचा ११७२ वा दिवस सुरु आहे.

अलीकडेच दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी सन्माननिय वित सचिव भारत सरकार,सेंट्रल प्राव्हिडंट फंड कमिशर(CPFO) एम्लायी प्राव्हिडंट फंड आर्गनायझेशन (EPFO) प्रमुख व त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत संघटना प्रतिनिधीची बैठक होऊन सविस्तर चर्चा झाली.

मात्र सकारात्मक चर्चा होऊन अद्यापही सदर प्रश्न प्रलंबित आहे.

त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाचा एक भाग म्हणून देशातील सर्व भविष्यनिर्वाहनिधी कार्यालया समोर एक दिवस "मुक धरणेआंदोलन" करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून भविष्यनिर्वाह निधी संघटन,क्षेत्रीय कार्यालय औरंगाबाद आज रोजी पेंशनधारकानी आंदोलनात सहभाग घेऊन मुक धरणे आंदोलन करण्यात आले.संघटनेच्या वतीने मा.पंतप्रधान यांना द्यावयाचे निवेदन भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालय औरंगाबाद मा.आयुक्त श्री जगदीश तांबे यांना राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सादर केले.

या आंदोलनात राष्ट्रीय सरचिटणीस विरेंद्रसिंग राजावत,राष्ट्रीय सल्लागार डॉ पि.एन पाटील, राष्ट्रीय महिला फ्रंटच्या उपाध्यक्ष जयश्री किवळेकर ताई,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री एस एन. अंबेकर, राज्य कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, राज्य उपाध्यक्ष डि. एन. लिपणे-पाटील, महाराष्ट्र राज्य महिला फ्रंटच्या अध्यक्षा सौ.कविता भालेराव, जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाडगावकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री साहेबराव निकम,जिल्हा अध्यक्ष महिला फ्रंट ज्योती शर्मा, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण कुलकर्णी, औरंगाबाद शहराध्यक्ष श्री संजय पाटील त्याच प्रमाणे किशनराव साळवे,अरविंद अवसरमल,निर्मला बडवे,मंगला तांबोळी,आशाताई काळे,भागाजी धोंडकर,उदय जोशी,हिप्पळनेकर,सुरेशबोर्डे,राठोड हरीष, मुकुंद कोकणे,प्रमोद धाडबळे,लाड दिनकर,सुर्यकांत पदकोंडे,सुरेश राजहंस,मच्छिंद्र मंगरूळे,आदींसह बहुसंख्य पेन्शनर उपस्थित होते.

Comments


bottom of page